वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप: पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारत ६९/२

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप: पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारत ६९/२

भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन देशांमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना रंगला आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रात दोन्ही संघांमध्ये अटीतटीचा सामना दिसून आला आहे. सध्या पहिल्या सत्राचा २८ षटकांचा खेळ झाला असून भारताने ६९ धावा केल्या आहेत. तर त्या बदल्यात भारताचे २ फलंदाज बाद झाले आहेत.

१८ जून रोजी सुरु होणारा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना हा पावसामुळे पहिल्या दिवशीच रद्द करण्यात आला. शनिवार १९ जून रोजी तरी हा सामना सुरु होणार का? याकडे जगभरातील क्रिकेट रसिकांचे लक्ष लागले होते. पण वरुण राजाने कृपा केल्यामुळे शनिवार १९ जून रोजी हा सामना ठरल्या वेळी सुरळीत सुरु झाला. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकली. नाणेफेक जिंकत न्यूझीलंडने गोलंदाजीचा निर्णय घेत भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले.

हे ही वाचा:

फिरायला जाणाऱ्यांना पुन्हा पुण्यात आल्यावर १५ दिवसांचा क्वॉरंटाईन

ठाकरे सरकार संविधानिक हक्कांवर गदा आणत गळा घोटण्याचं काम करतंय

शिवसेना आमदाराचा फुकट पेट्रोल भरण्याचा भिकारीपणा

महापुर टाळण्यासाठी अलमट्टी, हिप्परगा धरणातून पाण्याचा विसर्ग

भारतीय संघाकडून सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. पण त्यानंतर न्यूझीलंड संघाने सामन्यावर आपली पकड मजबूत केलेली दिसत आहे. या दोन्ही सलामीवीरांना बाद करत माघारी धाडण्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांना यश आले आहे. २१ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर जेमिसनने रोहित शर्मा याला बाद केले. टीम साऊदीने स्लिपमध्ये एक अप्रतिम झेल घेत रोहित शर्माचा खेळ संपवला. तर २५ व्या षटकात वॅग्नरने शुभमन गिलचा अडथळा दूर केला. शर्माने ३४ धावा केल्या असून गिल हा २८ धाव करून बाद झाला.

पहिले सत्र संपले तेव्हा भारताकडून कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा हे दोघे नाबाद खेळत आहेत. कोहलीने ६ धावा केल्या आहेत तर पुजाराने अजून आपले खाते उघडलेले नाही. तर धावफलकावर भारताने एकूण ६९ धावा नोंदवल्या आहेत.

Exit mobile version