विशालने विझवली मशाल, खर्गेंना दिले पाठिंब्याचे पत्र!

काँग्रेसची १३ वरून झाली १४ खासदारांची संख्या

विशालने विझवली मशाल, खर्गेंना दिले पाठिंब्याचे पत्र!

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षातून बंडखोरी करून अपक्ष म्हणून उभे राहून जिंकून येणारे विशाल पाटील यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे.विशाल पाटील यांनी दिल्लीमध्ये जाऊन मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेऊन काँग्रेसला पाठिंबा देत असल्याचे पत्र दिलं आहे.विशेष म्हणजे सांगलीच्या जागेवरून उद्धव ठाकरे आणि काँग्रेसमध्ये वाद झाला होता.अखेर उद्धव ठाकरेंना ही जागा मिळाली.परंतु, विशाल पाटील यांनी ठाकरेंच्या उमेदवाराला अस्मान दाखवत बाजी मारली.

आमदार विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली आणि काँग्रेसला पाठिंबा असल्याचे पत्र दिलं.विजयानंतर विशाल पाटलांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसलाच पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं होत.त्यानंतर आज विशाल पाटलांनी दिल्लीला जाऊन मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली.राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची देखील विशाल पाटील आणि विश्वजीत कदम यांनी भेट घेतली.

हे ही वाचा:

जेडीयूचा ‘एक राष्ट्र, एक मतदान’ आणि समान नागरी कायद्याला पाठिंबा!

निरपराध शेळीला मारण्यापेक्षा द्रमुक कार्यकर्त्यांनी माझ्याकडे यायला हवे होते !

विधानसभेचे पावसाळी अधिवेशन २७ जूनपासून

मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर पुन्हा एका व्यक्तीने मारली उडी, पोलिसांची दाणादाण!

दरम्यान, सांगलीत विशाल पाटील अपक्ष म्हणून तर महाविकास आघाडी उद्धव ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील आणि महायुतीकडून संजय काका पाटील अशी लढत होती.या लढाईत विशाल पाटील जिंकून आले. सांगलीच्या जागेवरून काँग्रेस-ठाकरे मध्ये तुतु-मैमै झाली होती. अखेर ठाकरे गटाच्या पदरात ही जागा पडली.परंतु विशाल पाटील यांनी अपक्ष उभे राहून उद्धव ठाकरेंची मशाल विझवत निवडणूक जिंकून दाखविली.विशाल पाटलांच्या विजयावर उद्धव ठाकरेंना विचारण्यात आले.परंतु, ठाकरेंनी बोलण्यास टाळाटाळ केली.दरम्यान, विशाल पाटलांच्या साथीने काँग्रेसच्या खासदारांच्या संख्येमध्ये वाढ होऊन १३ वरून ती आता १४ वर गेली आहे.

Exit mobile version