30 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरविशेषउंदरामुळे एका रुग्णाचा जीव गेल्यानंतरही राजावाडीत अस्वच्छता

उंदरामुळे एका रुग्णाचा जीव गेल्यानंतरही राजावाडीत अस्वच्छता

Google News Follow

Related

राजावाडी रुग्णालयात उंदराने डोळे कुरतडल्याने एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आता त्या रुग्णालयातील अस्वच्छतेचे चित्र समोर आले आहे. ही दुर्दैवी घटना घडल्यानंतरही अद्याप स्वच्छतेच्या बाबतीत रुग्णालय गंभीर नाही. त्यामुळे पुन्हा एकदा अशी घटना घडण्यासाठी रुग्णालय प्रतीक्षा तर करत नाही ना, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

रुग्णालयात सध्या अनेकठिकाणी नूतनीकरणाचे काम सुरू आहे. प्रवेशद्वाराजवळच खड्डे आहेत. लोखंडी शिगा, लाकडी फळ्या अस्ताव्यस्त पडल्या आहेत. या खड्ड्यांचा रुग्णांना त्रास होतो. अतिदक्षता विभागात तर वापरलेले हॅण्डग्लव्हज पडलेले आहेत. पाण्याच्या मशिन्स अस्वच्छ स्थितीत आहेत. काही मशिन्स या बंद पडल्या आहेत.

हे ही वाचा :

परमबीर सिंग दोन महिने सुट्टीवर

कॉलेजच्या ऑनलाइन लेक्चरमध्ये पॉर्न व्हिडीओने उडवला गोंधळ

पोलिसांच्या वाट्यालाही ठाकरे सरकारकडून उपेक्षा!

भारताने केली अग्नी प्राईम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

सिटी स्कॅन, क्षयरोग व कोविड कॅज्युल्टी विभागाजवळ वापरलेले सॅनिटरी पॅड उघड्यावर पडले आहेत. कोरोनाच्या काळातही ही अस्वच्छता कायम असल्यामुळे पुन्हा एकदा अशी घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आणखी किती जणांचे बळी जाण्याची वाट पाहिली जात आहे, असा सवाल रुग्णांच्या नातेवाईकांकडून विचारला जात आहे.

संबंधित प्रशासनाने या सगळ्या घडामोडींकडे लक्ष देऊन तात्काळ स्वच्छतेचे पालन करावे अशी मागणी केली जात आहे.

याच रुग्णालयात करोनाच्या एका रुग्णाचे डोळे कुरतडल्याची घटना घडली आणि मोठी खळबळ उडाली. त्यानंतर तो रुग्ण मृत्युमुखी पडल्याने सगळ्याच सरकारी रुग्णालयांच्या अवस्थेवर प्रश्न उपस्थित केला गेला. विरोधकांनीही या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरले.

भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी याबद्दल चिंता व्यक्त करत रुग्णालयात अशी दुर्दैवी घटना घडूनही या परिसरात घाणीचे साम्राज्य कायम असल्याबद्दल नाराजी प्रकट केली. टक्केवारी घ्या, पण साफसफाई करा, असे सत्ताधाऱ्यांना सांगण्याची वेळ आली आहे, असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा