अयोध्येत राम मंदिर बांधल्यानंतर नवीन स्थळांबद्दल मुद्दा उपस्थित करणे अमान्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मांडली भूमिका

अयोध्येत राम मंदिर बांधल्यानंतर नवीन स्थळांबद्दल मुद्दा उपस्थित करणे अमान्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशात सुरू असलेल्या मंदिर- मशीद वादाबद्दल चिंता व्यक्त केली. मोहन भागवत म्हणाले की, अयोध्येत राम मंदिर बांधल्यानंतर असे मुद्दे विविध ठिकाणी उपस्थित करून काही लोकांना ते हिंदूंचे नेते होतील, असे वाटते पण हे मान्य करता येणार नाही. पुण्यातील सहजीवन व्याख्यानमालेत ‘भारत विश्वगुरू’ या विषयावर व्याख्यान देताना मोहन भागवत यांनी हे वक्तव्य केले.

मोहन भागवत म्हणाले की, आपण एकत्र राहू शकतो हे भारताला जगाला दाखवण्याची गरज आहे. आपण बऱ्याच काळापासून एकोप्याने जगत आहोत. ही सद्भावना जगाला द्यायची असेल, तर त्याचे मॉडेल बनवायला हवे. राम मंदिर बांधले गेले कारण हा सर्व हिंदूंच्या श्रद्धेचा विषय होता.

मोहन भागवत पुढे म्हणाले की, भारतीयांनी भूतकाळातील चुकांमधून शिकले पाहिजे आणि सर्वसमावेशकतेचा सराव कसा करता येईल हे दाखवून वादग्रस्त मुद्दे टाळून आपला देश जगासमोर आदर्श बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. राम मंदिर हा श्रद्धेचा विषय होता आणि हिंदूंना ते बांधले जावे असे वाटले. पण द्वेष आणि शत्रुत्वातून काही नवीन स्थळांबद्दल मुद्दे मांडणे अस्वीकार्य आहे, असेही ते म्हणाले. समाजातील वाद कमी करण्याचा उपाय म्हणजे प्राचीन संस्कृतीकडे परत जाणे. अतिवाद, आक्रमकता, जबरदस्ती आणि इतरांच्या देवांचा अपमान करणे ही आपली संस्कृती नाही, असं मोहन भागवत यांनी ठळक केले. भारतात बहुसंख्य किंवा अल्पसंख्याक नाही; आपण सर्व एक आहोत. या देशात प्रत्येकाला आपली उपासना करण्याची पद्धत आचरणात आणता आली पाहिजे, असेही मोहन भागवत म्हणाले.

हे ही वाचा : 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,’अजित दादा तुम्ही एक दिवस जरूर मुख्यमंत्री व्हा’

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला दणका; आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे आयोजन हायब्रिड मॉडेलनेचं!

एकनाथ शिंदेंचे नमस्ते सदा वत्सले… घरगड्याला वांत्या..

फेक नरेटिव्हला थेट नरेटिव्हने उत्तर दिले जाईल!

मोहन भागवत म्हणाले, “जागतिक शांततेबाबत मोठमोठ्या घोषणा केल्या जात आहेत. आपल्याला (भारताला) जागतिक शांततेचा सल्ला दिला जात आहे, पण युद्धे थांबत नाहीत. आपल्याच देशातील अल्पसंख्याकांची चिंता करण्याचे वारंवार सांगितले जात असताना, बाहेर अल्पसंख्याकांना कोणत्या प्रकारची परिस्थिती भेडसावत आहे हे आपण पाहत आहोत.”

आरएसएस प्रमुख म्हणाले की, जगभरातील वाढता संघर्ष हा अयशस्वीपणाचा पुरावा आहे आणि शांतता पुनर्संचयित करण्यासाठी पुढाकार घेण्याची जबाबदारी भारतावर टाकली आहे. काही देश जागतिक शांततेबद्दल बोलून आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या देशाने इतिहासात हेच केले आहे. जगाला शांततेची गरज आहे आणि भारत ही गरज पूर्ण करू शकतो.

Exit mobile version