28.5 C
Mumbai
Saturday, April 12, 2025
घरविशेषसत्ता गेली; आता 'आप' नेते बनले चक्क युट्युबर!

सत्ता गेली; आता ‘आप’ नेते बनले चक्क युट्युबर!

सौरभ भारद्वाज यांनी केली होती सुरुवात 

Google News Follow

Related

दिल्लीत आम आदमी पक्षाची सत्ता गेल्यानंतर पक्षातील नेते युट्युबवर वळत आहेत. सौरभ भारद्वाज यांच्यानंतर आता पक्षाच्या आणखी एका गतिमान नेत्याने युट्युब चॅनेल तयार केले आहे. किरडीचे माजी आमदार ऋतुराज झा युट्युबकडे वळले आहेत. त्यांनी त्यांच्या नावाने एक युट्युब चॅनेल तयार केले आहे, ज्यावर ते राजकारण, जीवनशैली आणि प्रवास अशाप्रकारच्या सर्व विषयांवरील व्हिडीओ अपलोड करणार आहेत.

राजकीय पक्षांच्या नेत्यांना कधी सत्तेत राहून लोकांसाठी काम करावे लागते तर कधी विरोधी पक्षात राहून आवाज उठवावा लागतो. दशकाहून अधिक काळ सत्तेत राहिल्यानंतर आप पहिल्यांदाच दिल्लीत पक्षाच्या भूमिकेत आली आहे. एकीकडे पक्षाचे नेते वीज, शिक्षण, रुग्णालये, मोफत बस सेवा अशा अनेक मुद्यांवर दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या भाजपा सरकारला कोंडीत पकडण्यात व्यस्त असताना दुसरीकडे काही नेते आता You Tube वर आपली उपस्थिती मजबूत करण्यात व्यस्त आहेत.

हे ही वाचा : 

ममता बॅनर्जी यांच्या हिंदूंवरील अत्याचाराविरोधात अग्निमित्रा पॉल काय म्हणाल्या…

मोदींनी उद्घाटन केलेल्या ‘पंबन रेल्वे ब्रिज’ची वैशिष्ट्ये बघा

हरिद्वारमध्ये बेकायदा मजारवर कसा चालवला बुलडोझर

मोदींच्या श्रीलंका दौऱ्याबद्दल काय म्हणाले स्थानिक

दिल्ली सरकारचे माजी मंत्री सौरभ भारद्वाज यावेळी त्यांच्या ग्रेटर कैलाश मतदारसंघातून निवडणूक हरले. अशा परिस्थिती त्यांनी स्वतःला ‘बेरोजगार’ म्हटले आणि ‘बेरोजगार नेता’जी अशा नावाने युट्युब चॅनेल सुरु केले. घर चालवण्यासाठी काम शोधत असल्याचे त्यांनी म्हटले होते. तथापि, सौरभ भारद्वाज यांची बेरोजगारी दूर करण्यासाठी अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीची कमान त्यांच्याकडे सोपवली. दिल्लीचे समन्वयक बनल्यानंतरही सौरभ भारद्वाज युट्युबवर अर्धवेळ काम करत आहेत. दरम्यान, आमदार ऋतुराज झा यांनी युट्युब चॅनेल तयार करून आपले काम वाढवले आहे. त्यांनी आपल्या युट्युब चॅनेलवर दोन व्हिडीओ पोस्ट केले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
241,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा