दिग्गज क्रिकेटपटू एम. एस. धोनी यांनी चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) च्या घरच्या मैदान चेपॉक व्यतिरिक्त मुंबईतील वानखेडे स्टेडियम हे आपले आवडते मैदान असल्याचे सांगितले आहे.
२०११ मध्ये धोनीने वानखेडे स्टेडियममध्ये २८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारताला आयसीसी वनडे विश्वचषक जिंकवून दिला. धोनी २००८ पासून चेन्नई सुपर किंग्जचा अविभाज्य भाग आहेत आणि त्यांचा एम.ए. चिदंबरम स्टेडियम (चेपॉक) सोबत खास नाते जुळले आहे.
धोनीने जिओ हॉटस्टारच्या “द एमएस धोनी एक्सपीरियन्स” मध्ये सांगितले, “मी हे म्हणणार नाही की माझे दुसरे आवडते स्टेडियम कोणते आहे, कारण जिकडे जाऊ तिकडे आम्हाला एकसारखेच प्रेम मिळते. पण मुंबईसाठी माझ्या मनात एक विशेष स्थान आहे. २००७ मध्ये जेव्हा आम्ही टी-२० विश्वचषक जिंकलो, तेव्हा आम्हाला इथे खूप छान स्वागत मिळाले. तसेच, २०११ चा विश्वचषक अंतिम सामना देखील इथेच झाला होता. त्यामुळे वानखेडे स्टेडियम माझ्या हृदयात खास स्थान ठेवते.”
चेपॉकमध्ये सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम धोनीच्या नावावर!
४३ वर्षीय धोनी म्हणाले की, “भारतासारख्या देशात एक विशिष्ट स्टेडियम निवडणे खूप कठीण आहे. पण चेपॉक माझ्यासाठी खास आहे, कारण तिथे चाहत्यांचे आवाज आणि शिट्ट्या खूप ऊर्जा देतात.” धोनीच्या नावावर चेपॉक स्टेडियममध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आहे. ७० सामन्यांत त्यांनी ७४ षटकार ठोकले असून १,४६९ धावा (स्ट्राइक रेट – १४५.१५) आणि ९३ चौकार लगावले आहेत.
धोनी पुढे म्हणाले, “बंगळुरूमध्येही प्रेक्षकांचा प्रतिसाद कमालीचा असतो. कोलकाता आणि अहमदाबादमध्येही मोठी गर्दी असते. त्यामुळे एक स्टेडियम निवडणे खूप अवघड होऊन बसते. कारण भारतात प्रेक्षक पूर्ण मनाने संघाचे आणि क्रिकेटचे समर्थन करतात.”
आयपीएलमध्ये मिळणाऱ्या प्रेमाबद्दल धोनीचा खास संदेश
धोनीने आयपीएलमध्ये चाहत्यांकडून मिळणाऱ्या प्रेमावर भाष्य करताना सांगितले, “ही चाहत्यांकडून मिळणारी एक प्रकारची कृतज्ञता आहे. ते सांगत असतात, ‘तुमच्या खेळासाठी धन्यवाद!’ मला ही भावना खूप आवडते. क्रिकेटमध्ये भारत हा खेळण्यासाठी सर्वोत्तम देश आहे.”
धोनी पुढे म्हणाले, “भारतीय संघाचा भाग होणे हे खूप मोठे भाग्य आहे. मी आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नाही, त्यामुळे आयपीएल ही माझ्यासाठी सर्वात मोठी गोष्ट आहे. मैदानात उतरल्यानंतर संपूर्ण स्टेडियम माझ्या कामगिरीची आतुरतेने वाट पाहत असते. जरी काही वेळा मी अशा संघाविरुद्ध खेळत असतो, ज्याला प्रेक्षक जिंकताना पाहू इच्छितात, तरीही ते मला पाठिंबा देतात.”
हेही वाचा :
आशुतोष शर्माला आवडते फिनिशरची भूमिका
कौंच बियाणे, कोलेस्टेरॉल कमी करण्यास फायदेशीर
कमजोरी, सर्दी-खोकल्यावर ‘च्यवनप्राश’चा प्रभावी उपाय
वानखेडेवरील २०११ विश्वचषक विजय आणि चाहत्यांच्या आठवणी
धोनीने आपल्या आयुष्याच्या सर्वात मोठ्या विजयांपैकी एक २०११ विश्वचषकाच्या आठवणी शेअर केल्या. २०२३ मध्ये लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध इकाना स्टेडियममध्ये धोनी फलंदाजीला आला तेव्हा ध्वनी पातळी ९५ डेसिबलपर्यंत पोहोचली होती! एवढ्या आवाजाच्या पातळीवर १० मिनिटे राहिल्यास ऐकण्याची क्षमता तात्पुरती कमी होऊ शकते.
धोनीने शेवटी सांगितले, “हा एक अद्भुत अनुभव आहे. तुम्हाला संपूर्ण देशाचा पाठिंबा मिळत असेल, तर त्यासारखे काहीही नाही!”