सोमवारी (१४ ऑक्टोबर) रात्री उत्तर प्रदेशातील कुशीनगरमध्ये भगवान श्रीरामांविरुद्ध सोशल मीडियावर अपमानास्पद पोस्ट टाकल्याने लोकांनी गोंधळ घातला. पोलिसांनी समज देऊन लोकांना शांत केले. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. या भागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
प्रभू श्रीरामांविरुद्ध वादग्रस्त पोस्ट व्हायरल झाल्यानंतर विष्णुपुरा पोलिस स्टेशन हद्दीतील दुधी बाजारातील गांधी चौकात मोठ्या संख्येने आंदोलक जमा झाले. ‘जय श्री राम’च्या घोषणा देत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी आंदोलकांनी केली. आक्षेपार्ह पोस्ट लिहिणारा तरुण अद्याप पोलिसांच्या ताब्यात असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी त्याच्या वडिलांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला.
हे ही वाचा :
कॅनडाच्या ट्रुडो यांना लोक कंटाळले; कॅनडियन पत्रकाराचा दावा
कॅनडा पोलिसांचा गंभीर दावा; भारतीय गुप्तहेर लॉरेन्स बिश्नोई गँगसोबत करतात काम
बाबा सिद्दीकी प्रकरण; पुण्यातून ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीला पोलीस कोठडी
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणः पुण्यात लोणकरने दूध डेअरीत शूटर्सच्या घेतल्या बैठका
या प्रकरणी माहिती देताना तमकुहिराज क्षेत्र अधिकारी जितेंद्र कालरा म्हणाले, ‘प्रभू श्री राम यांच्याबाबत एका व्यक्तीने अशोभनीय टिप्पणी केली होती. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून एका व्यक्तीला अटक केली आहे. या प्रकरण अधिक तपास सुरु आहे. दरम्यान, आरोपी तरुण मुस्लिम समाजातील असल्याचे सांगण्यात येत आहे.