बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ!

एके-४७ सह पोलीस कर्मचारी घराबाहेर तैनात

बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ!

बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या गैलेक्सी अपार्टमेंट बाहेरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर सलमान खानच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. एके-४७ सह पोलीस कर्मचारी सलमान खानच्या घराबाहेर तैनात आहेत.

सीसीटीव्ही कॅमेराद्वारे देखील नजर ठेवण्यात येणार आहे. बाबा सिद्दीकी यांची हत्या करणारे आरोपी लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याच्या माहितीनंतर पोलिसांनी सलमान खानच्या घराबाहेर सुरक्षा वाढविली आहे. यापूर्वी देखील सलमान खानच्या घरावर बंदुकीने हल्ला झाला होता. त्यावेळी देखील बिश्नोई टोळीचे नाव पुढे आले होते. बाबा सिद्दीकींच्या हत्येमध्ये बिश्नोई टोळीचे नाव पुढे येताच सलमान खानच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

हे ही वाचा : 

रेल्वे रुळावर सापडला ‘एलपीजी सिलिंडर’

बाबा सिद्दीकी हत्या, हल्लेखोरांना किल्ला न्यायालयात हजर करण्यात येणार, हत्येमागे लॉरेन्स बिष्णोई!

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या

सरकार स्थापन करताचं धारावी प्रकल्प रद्द करणार

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी आमदार बाबा सिद्दीक यांच्यावर शनिवारी रात्री वांद्रे (पूर्व) येथे गोळीबार झाला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. या गोळीबारप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोघांना अटक केली. गुरमेल सिंग आणि धर्मराज कश्यप अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आणखी एका आरोपीचा शोध सुरु आहे. आरोपीच्या अटकेसाठी चार-पाच पोलीस पथके रवाना झाली आहेत. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Exit mobile version