अयोध्या, काशी आणि मथुरा नंतर आता राजस्थानच्या अजमेरमधील ८०० वर्ष जुन्या मशिदीवरून वाद वाढण्याची शक्यता आहे.भारतीय जनता पक्षाच्या खासदाराने १२ व्या शतकात बांधलेल्या ‘धाई दिन का झोपरा'(अडीच दिवसांची झोपडी) मशिदीच्या जागी मंदिर आणि संस्कृत शिक्षण केंद्र पुन्हा सुरु करण्याची मागणी केली आहे.याबाबत त्यांनी केंद्र सरकारचे सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री जी.किशन रेड्डी यांना पत्र लिहिले आहे.
जयपूरचे लोकसभा खासदार रामचरण बोहरा यांनी केंद्रीय मंत्र्यांना पत्र लिहून म्हटले आहे की, बाराव्या शतकात महाराज विग्रहराज चौहान यांनी या ठिकाणी मंदिर आणि संस्कृत शिक्षण केंद्र स्थापन केले होते.मोहम्मद घोरीच्या आदेशानुसार कुतुबुद्दीन ऐबकने आधीच बांधलेली संस्कृत शाळा तोडून टाकली.
वेद आणि पुराणांचा प्रसारक असण्याबरोबरच हे केंद्र संस्कृत शिक्षणाचेही महत्वाचे केंद्र होते.इस्लामी दहशतवादाच्या गुलामगिरीचे हे प्रतीक आजही भारतीय समजावर कलंक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.या मशिदीच्या जागी पुन्हा सांस्कृतिक शिक्षण संस्था स्थापन करावी, अशी बोहरा यांची इच्छा आहे.याबाबत बोहरा यांनी मंत्री जी.किशन रेड्डी यांना पत्र लिहिले आहे.
हे ही वाचा:
निवडणूक संचालन समितीच्या समन्वयकपदी आ. अतुल भातखळकर
ठाकरेंना दणका; शिवसेना शिंदेंचीचं, १६ आमदार पात्र!
भारतातील सर्वात वयोवृद्ध सरिस्काची वाघीण ‘राजमाताचा’ मृत्यू!
अहो आश्चर्यच ! राजीव गांधी यांच्या हातातून चक्क रक्त येऊ लागले
ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती दर्ग्यापासून ५०० मीटर अंतरावर ‘धाई दिन का झोपरा’हे ठिकाण आहे.मशिदीची देखभाल राजस्थान मुस्लिम वक्फ बोर्ड करते.हे ठिकाण पाहण्यासाठी दररोज मोठ्या संख्येने लोक येथे येत असतात.
‘धाई दिन का झोपरा’ नाव कसे पडले?
सांगितले जाते की, मंदिर आणि शैक्षणिक केंद्र पाडून अवघ्या अडीच दिवसात त्याचे मशिदीत रूपांतर झाले.म्हणून याला ‘धाई दिन का झोपरा’ असे नाव देण्यात आले.असे म्हटले जाते की, या वास्तूमध्ये अनेक चिन्हे आहेत जी हिंदू धर्माशी संबंध दर्शवतात.दरम्यान, रामचरण बोहरा यांच्या मागणीमुळे वाद चिघळण्याची शक्यता आहे.