28 C
Mumbai
Tuesday, September 17, 2024
घरविशेषअमित शहांनंतर शिंदे शिवसेनेचा उद्धव ठाकरेंवर प्रहार !

अमित शहांनंतर शिंदे शिवसेनेचा उद्धव ठाकरेंवर प्रहार !

व्यंगचित्राच्या माध्यमातून औरंगजेब फॅन क्लबच्या विषयावर टीकास्त्र

Google News Follow

Related

दहशतवाद्यांना पाठीशी घालणाऱ्या काँग्रेसला उद्धव ठाकरेंनी साथ दिली. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी ही औरंगजेब फॅन क्लब आहे. तर या क्लबचे नेते म्हणून उद्धव ठाकरेंची ओळख आहे, अशी जोरदार टीका नुकत्याच झालेला पुण्यातील एका कार्यक्रमात देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी केली होती. याच विषयावर आता शिवसेना पक्षानेही आपल्या फेसबुक पेजवर प्रसारित झालेल्या व्यंगचित्राच्या माध्यमातून उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडले आहे.

२०१९ साली स्वतःच्या स्वार्थी राजकारणासाठी आणि मुस्लीम मतांसाठी भगव्याशी आणि हिंदुत्ववादी विचारांशी फारकत घेऊन उद्धव ठाकरेंनी आपली विचारसरणी बदलून टाकली. हिंदू जनता जुमानत नाही , हे समजल्यावर मतांच्या हव्यासापोटी औरंग्या वृत्तींना पाठबळ देण्याची रणनीती उद्धव ठाकरे आखत आहेत. त्यांच्या याच स्वार्थी वृत्तीचा समाचार पुण्यात नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला.

हे ही वाचा:

अर्थसंकल्पात आदिवासींसाठी ‘प्रधानमंत्री आदिवासी उन्नत ग्राम अभियान’

भविष्यातील वृद्धी दिसणारा संतुलित अर्थसंकल्प!

‘मोदी ३.0 सरकार’च्या अर्थसंकल्पानंतर काय स्वस्त, काय महाग?

बजेट २०२४; देशवासीयांच्या आशा, आकांक्षा आणि विश्वास पूर्ण करण्याच्या संकल्पाचे प्रतिबिंब !

ज्या काँग्रेसने कायम दहशतवाद्यांना पाठिंबा दिला त्याच काँग्रेसला उद्धव ठाकरेंनी साथ दिली. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी ही औरंगजेब फॅन क्लब आहे. तर उद्धव ठाकरे या क्लबचे नेते आहे, अशी सडकून टीका यावेळी अमित शहा यांनी महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरेंवर केली. दरम्यान, अमित शहा यांच्या जोरदार टीकेपाठोपाठ शिवसेना पक्षानेही व्यंगचित्राच्या माध्यमातून उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडले. हे व्यंगचित्र पक्षाच्या अधिकृत फेसबुक पेजवर प्रसारित झाले असून या व्यंगचित्राची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
177,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा