राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त एसटी महामंडळ संदर्भात एक महत्वाची घोषणा केली आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘स्वच्छ सुंदर एसटी बस स्थानक’ असा उपक्रम राबविण्यात येत असून हा उपक्रम आणखी प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. तसेच एसटी महामंडळाच्या सदिच्छादूताच्या (ब्रँड अँम्बेसिडर) नावाची घोषणाही करण्यात आली आहे.
मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध सेलिब्रेटी, विनोदवीर मकरंद अनासपुरे यांची एसटी महामंडळाचे सदिच्छादूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या नावाची घोषणा करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
मकरंद अनासपुरे यांनी नव्या जबाबदारीबद्दल आनंद व्यक्त केला आहे. एसटीसाठी जे काही करता येईल ते करण्यावर आपण भर देणार असल्याचे आणि प्रयत्न करणार असल्याचे मत मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केलं आहे.
राज्य सरकार एसटीच्या माध्यमाने विविध प्रवास सवलती प्रवाशांसाठी लागू करतं. या योजनांची, सवलतींची माहिती सदिच्छा दूताच्या माध्यमाने राज्यातील खेडोपाडी पोहोचविण्यात येते. ग्रामीण भागाची जाण असलेली, स्पष्ट वक्ती आणि दांडगा जनसंपर्क आणि एसटीने प्रवास केलेली व्यक्ती असे एसटी महामंडळाच्या सदिच्छादूताचे निकष होते.
हे ही वाचा:
सहा महिने वाट न पाहताही घटस्फोट दिला जाऊ शकतो
केंद्र सरकारचा डिजिटल स्ट्राईक , पकिस्तानशी संबंधित १४ मेसेंजर ऍपवर बंदी
‘महाविकास आघाडीला शरीया कायदा लागू करायचा आहे’
इसिसचा प्रमुख अबू हुसेन अल-कुरेशी सैन्याबरोबरच्या चकमकीत ठार
सन २००३ साली महामंडळाचे सदिच्छा दूत म्हणून ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची नियुक्ती करण्यात आली होती. आता तब्बल २० वर्षांनी त्या जागी मकरंद अनासपुरे यांची निवड करण्यात आली आहे.