26 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेषअक्षय कुमार पाठोपाठ विकी कौशललाही कोरोनाची लागण

अक्षय कुमार पाठोपाठ विकी कौशललाही कोरोनाची लागण

Google News Follow

Related

देशात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना बॉलिवूडलाही कोरोनाने विळखा घालायला सुरुवात केली आहे. अक्षय कुमार, भूमी पेडणेकर, गोविंदा यांच्या नंतर आता विकी कौशल यालाही कोरोनाची लागण झाली असून तो आता क्वॉरन्टाईन आहे. स्वत: विकी कौशलने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन ही माहिती दिली आहे.

विकी कौशलने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, “मी कोणताही निष्काळजीपणा केला नाही. सर्व गोष्टींबाबत खबरदारी घेतली. तरीही मला कोरोनाची लागण झाली आहे. सध्या मी क्वॉरन्टाईन असून डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे उपचार घेत आहे.”

अभिनेता अक्षय कुमारने रविवारी (४ एप्रिल) सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला कोरोनाची लागण झाली असून आयसोलेट केल्याचं सांगितलं होतं. पण आता एबीपीला मिळालेल्या माहितीनुसार अक्षय कुमारच्या आगामी ‘राम सेतु’ चित्रपटाशी संबंधित ४५ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

हे ही वाचा:

आता गृहमंत्र्यांनी नैतिकतेच्या तत्त्वाला अनुसरून राजिनामा द्यावा

थोडी तरी लाज शिल्लक असेल तर राजीनामा द्या

सामान्य जनतेसाठी लॉकडाऊन, मंत्री मात्र विनामास्क प्रचारात

अमित शाहांनी वाहिली हुतात्मा जवानांना श्रद्धांजली

अनेक बॉलिवूड कलाकार कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. अभिनेता अक्षय कुमार पाठोपाठ प्रसिद्ध अभिनेते गोविंदा यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. गोविंदा सध्या होम क्वॉरंटाईन असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

गायक आदित्य नारायण आणि त्याची पत्नी श्वेता अगरवाल यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. या आधी रणबीर कपूर, संजय लीला भंसाळी, मनोज बाजपेयी, आलिया भट्ट यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा