दीर्घ प्रतीक्षेनंतर मुंबईत पावसाचे आगमन

मुंबईसह राज्यात इतर भागात पावसाला सुरुवात

दीर्घ प्रतीक्षेनंतर मुंबईत पावसाचे आगमन

उशिरा येणाऱ्या पावसाचे अखेर आगमन झाले असून राज्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईसह उपनगरात वरुण राजाचे आगमन झाले आहे. त्यामुळे उष्णतेपासून त्रासलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. राज्यात विदर्भासह कोकण आणि मुंबई परिसरात पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळाला आहे. मात्र, काही ठिकाणी अद्यापही पावसाची प्रतिक्षा कायम आहे.

दीर्घ प्रतीक्षेनंतर मुंबईत पावसाचे आगमन झाले असून मुलुंड, विक्रोळी, घाटकोपर, दादर, अंधेरी, गोरेगाव, बोरिवली या उपनगरात ढगाळ वातावरणासह पावसाने हजेरी लावली आहे. पावसाचे आगमन लांबल्याने मुंबई शहरावर पाणी टंचाईचे संकट घोंगावत होते. मात्र, पावसाच्या हजेरीनंतर हे संकट टळण्याची शक्यता आहे. तसेच ठाणे,नवी मुंबईच्या परिसरात देखील पावसानं हजेरी लावली. पुढील ४८ तास पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून हुलकावणी देणाऱ्या पावसाने गडचिरोली, यवतमाळ, पंढरपूर या भागांमध्येही हजेरी लावली आहे. त्यामुळे उकाड्यानं त्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर बळीराजाही सुखावला आहे. कोकणातही पावसाने दमदार हजेरी लावली असून चिपळूण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग भागात पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे कोकणात शेतीच्या कामांना वेग येणार आहे.

हे ही वाचा:

गोरेगावच्या यशोधाम शाळेत १४ वर्षीय मुलाचा तरण तलावात बुडून मृत्यू

पंतप्रधान मोदी ‘ग्लोबल लीडर’, नऊ वर्षात १२ देशांमधील संसदेत संबोधन

पाटण्यामधील बैठक ही ‘मोदी हटाव’ नव्हे तर ‘परिवार बचाव’ बैठक

‘प्लेन हायजॅक का प्लॅन है’ असा संवाद साधणाऱ्या प्रवाशाला अटक

पुढच्या आठवड्यात पंढरपुरात आषाढी वारीचा सोहळा आहे. त्यापूर्वीच पंढरपूरमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Exit mobile version