बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर ‘छावा’ येतोय ओटीटीवर; कोणत्या दिवशी होणार प्रदर्शित?

‘छावा’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट

बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर ‘छावा’ येतोय ओटीटीवर; कोणत्या दिवशी होणार प्रदर्शित?

छत्रपती संभाजी महाराजांची शौर्य आणि त्यागाची कथा सांगणारा ‘छावा’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. ‘छावा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेला हा सिनेमा विक्रमी कमाई करताना दिसत असून या सिनेमानं जगभरात ७९०.१४ कोटींची कमाई केली आहे. सिनेमागृहांमध्ये प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेला हा सिनेमा आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपली कमाल दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. लवकरच हा सिनेमा आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

‘छावा’ चित्रपटात विकी कौशल याने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केली असून या व्यतिरिक्त रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा, दिव्या दत्ता, विनीत कुमार सिंग, संतोष जुवेकर आणि आशिष पाथोडे हे कलाकार पाहायला मिळाले. थिएटरनंतर चित्रपटाचे चाहते सिनेमाच्या ओटीटी रिलीजची आतुरतेने वाट पाहत होते. आता त्यांची ही प्रतीक्षा संपली आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे. अभिनेता विकी कौशलने त्याच्या इंस्टाग्रामवर ‘छावा’च्या ओटीटी रिलीजची माहिती दिली आहे.

चित्रपटाचे पोस्टर शेअर करत विकी कौशल याने लिहिले आहे की, आले राजे आले… ऐतिहासिक काळातील शौर्य आणि अभिमानाची कहाणी पहा. ११ एप्रिल रोजी नेटफ्लिक्सवर छावा पाहा. अभिनेत्याची ही पोस्ट पाहून चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यामुळे छावा हा सिनेमा शुक्रवार, ११ एप्रिल रोजी नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे, हे स्पष्ट झाले आहे.

हे ही वाचा..

“शी जिनपिंग अत्यंत हुशार व्यक्ती”, चिनी आयातीवर १२५% कर लावणारे ट्रम्प असं का म्हणाले?

जेएनयूमध्ये पुन्हा शांभवी थिटेने डाव्यांना आवाज दिला; महाराणा प्रताप यांचा अपमान

संविधानानुसार वक्फ विधेयक मंजूर

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ५० वा वाराणसीचा दौरा

२०२५ मध्ये सर्वात जास्त कमाई करणाऱ्या बॉलीवूड सिनेमांमध्ये छावा सिनेमा पहिल्या क्रमांकावर आहे. या सिनेमाने जगभरात ७९०.१४ कोटींची कमाई केली आहे. तर भारतीय बॉक्स ऑफिसवर चित्रपटानं ६०० कोटींच्या जवळपास गल्ला जमवला आहे. दोन महिन्यानंतरही सिनेमा अनेक ठिकाणी थिएटरमध्ये टिकून आहे. विकी कौशल आता ‘छावा’ सिनेमानंतर ‘लव्ह अँड वॉर’ चित्रपटात दिसणार आहे, ज्यामध्ये तो रणबीर कपूर आणि आलिया भटसोबत दिसणार आहे. हा चित्रपट संजय लीला भन्साळी बनवत आहेत. याशिवाय, विकीकडे ‘महावतार’ हा चित्रपट असल्याची देखील माहिती आहे. अमर कौशिक हा सिनेमा दिग्दर्शित करत आहे. याशिवाय ‘एक जादुगर’ हा चित्रपट देखील आहे जो शूजित सरकार दिग्दर्शित करत आहे. तिन्ही चित्रपटांमध्ये विकी वेगवेगळ्या अंदाजात दिसणार आहे.

मग तुम्ही आमदार असून उपयोग काय ? | Mahesh Vichare | Amit Gorkhe | Devendra Fadnavis | Eknath Shinde

Exit mobile version