भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मूळ गाव असलेल्या ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील राईरंगपूर आणि बदामपहाडमधून लवकरच पहिली रेल्वे धावणार आहे. आदिवासी बहुल असलेल्या मयूरभंज जिल्ह्यात तीन रेल्वेंना नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे.
रेल्वेच्या दक्षिण-पूर्व विभागांत येणाऱ्या मयूरभंज जिल्ह्यात यामुळे रेल्वेचे जाळे निर्माण होण्यास यामुळे मदत होईल. नवीन रेल्वेमध्ये कोलकतामधील शालीमार ते बदामपहाड, बदामपहाड ते रूरकेला, रुरकेला ते टाटानगर या रेल्वेगाड्यांचा समावेश आहे.
बदामपहाड मार्गावर पहिल्यांदाच एक्स्प्रेस किंवा मेल धावेल, असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे, राष्ट्रपती मुर्मू यांचे मूळ गाव असलेले राईरंगपूर आणि बदामपहाड प्रथमच एक्स्प्रेसने जोडले जाणार आहेत. या भागातील लोकांची एक्स्प्रेस रेल्वेची प्रदीर्घ काळापासून मागणी होती. नवी रेल्वे स्थानिकांच्या आकांक्षा पूर्ण करेल. स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देईल. त्याचप्रमाणे, आदिवासी भागाचा विकासात मदत होईल, अशी अपेक्षाही रेल्वेमंत्री वैष्णव यांनी या निवेदनात व्यक्त केली आहे.
शालिमार (कोलकता) – बदामपहाड ही एक्स्प्रेस दर शनिवारी रात्री अकरा वाजून पाच मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजून चाळीस मिनिटांनी बदामपहाडला पोचेल. त्यानंतर, प्रत्येक रविवारी रात्री ९.३० वाजता बदामपहाडहून शालिमारला प्रस्थान करेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजता पोचेल. ही एक्स्प्रेस खरगपूर, झारग्राम, टाटानगर आदी ठिकाणी थांबेल.
हे ही वाचा:
दिल्ली महिलांसाठी असुरक्षितच; सौम्य विश्वनाथन प्रकरणाने करून दिली आठवण
शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना गाझाला पाठवावे!
एकनाथ खडसे आणि कुटुंबियांना १३७ कोटींच्या दंडाची नोटीस
बायडन आणि नेतान्याहू यांची भेट; हमासवर साधला निशाणा
बदामपहाड- रुरकेला ही रेल्वे दर रविवारी सकाळी ६ वाजून दहा मिनिटांनी सुटेल आणि रुरकेलाला सकाळी ११.४० मिनिटांनी पोहचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी दर रविवारी, रूरकेलाहून दुपारी २ वाजून २० मिनिटांनी निघेल आणि बदामपहाडला संध्याकाळी ७.२५ वाजता पोहचेल. या गाडीला राईरंगपुर, टाटानगर, चक्रधरपूर हे थांबे असतील.