जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा आणि इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघात गुजरातच्या अर्झन नागवासवालाने स्थान मिळवले. तो स्टँडबाय खेळाडू म्हणून इंग्लंडला जाईल. त्यामुळे एका पारसी खेळाडूची टीम इंडियात सुमारे ४६ वर्षांनी निवड झाली आहे.
त्याच्यापूर्वी फारुख इंजिनियर हे टीम इंडियाचे विमान पकडणारे पारसी क्रिकेटपटू होते. फारुख इंजिनियर यांनी १९७५ मध्ये भारताकडून शेवटचा कसोटी सामना खेळला तर महिला क्रिकेटपटू डायना एडलजी यांनी जुलै १९९३ मध्ये शेवटचा सामना खेळला होता. आता अर्झन नागवासवालाने तब्बल ४६ वर्षांनी पारसी क्रिकेटपटू म्हणून टीम इंडियात एन्ट्री घेतली आहे.
हे ही वाचा:
महाराष्ट्रातील वैशाख वणव्यावर पावसाच्या सरींचा उतारा
कोविड पाठोपाठ बळावतोय आणखी एका आजाराचा धोका
सरकारची वृत्ती ‘गरज सरो वैद्य मरो’ अशीच
कोविड रुग्णांना भारतीय बनावटीच्या ‘वायुपुत्रा’ची साथ
वलसाड जिल्ह्यात “नारगोल” खेड्यातील रहिवासी असलेल्या अर्जनने क्रिकेटचे प्राथमिक धडे आपल्या मोठ्या भावाकडेच व्हिस्पीकडेच गिरवले होते. डावखुरा मध्यमगती गोलंदाज असणाऱ्या अर्झनने २०१८ मध्ये बडोद्याविरूद्ध प्रथम श्रेणी पदार्पण केले. वानखेडे स्टेडियमवर मुंबई विरुद्ध एका डावात ५ विकेट घेत तो चर्चेत आला. त्यानंतर २०१९-२० च्या रणजी सामन्यात नागवासवालाने तब्बल ४१ विकेट पटकवल्या होत्या. त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतरच्या विजय हजारे करंडक स्पर्धेत देखील त्याने गुजरातला १९ विकेट पटकवून दिल्या होत्या. त्यामुळेच त्यांची इंग्लंडला रवाना होणाऱ्या टीम इंडियात वर्णी लागली आहे.
याबद्दल क्रिकेटपटू फारूख इंजिनियर यांनी देखील आनंद व्यक्त केला आहे. त्याबरोबरच त्याला नुसता राखीव गोलंदाज म्हणून बघायचं नसून त्याला प्रमुख गोलंदाज म्हणून बघायला आवडेल असेही त्यांनी म्हटले आहे.