अमेरिकेत पळून गेलेला आरोपी २५ वर्षानंतर सीबीआयच्या जाळ्यात!

इंटरपोलच्या मदतीने आरोपीला अटक

अमेरिकेत पळून गेलेला आरोपी २५ वर्षानंतर सीबीआयच्या जाळ्यात!

२५ वर्षांपासून फरार असलेला बँक घोटाळा आरोपी राजीव मेहता याला अमेरिकेतून परत आणण्यासाठी सीबीआयने पावले उचलली आहेत.इंटरपोलच्या मदतीने त्याला अमेरिकेतून परत आणले जात आहे.दरम्यान,आरोपी मेहताला १९९९ मध्ये न्यायालयाने फरारी गुन्हेगार म्हणून घोषित केले होते.त्यानंतर आरोपी राजीव मेहता हा २००० पासून फरार होता.

सीबीआयच्या विनंतीवरून इंटरपोलने १६ जून २००० रोजी त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. सीबीआयच्या प्रवक्त्याने सांगितले की, राजीव मेहता याच्यावर १९९८ साली नवी दिल्लीतील सेंट्रल बँक ऑफ इंडिया ग्रेटर कैलाश-२ येथील शाखेत बनावट बँक खाती उघडण्याशी संबंधित फसवणूक, चोरी आणि गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खात्यांद्वारे तो विविध पक्षांचे बँक ड्राफ्ट ठेवत असे आणि नंतर ते कॅश करत असे. याप्रकरणी सीबीआय त्याचा शोध घेत होती.

हे ही वाचा :

उत्तर प्रदेशात सपाला आणखी एक धक्का बसणार!

सपा आमदार इरफान सोळंकी यांच्या घरावर ईडीची छापेमारी!

एडनच्या आखातात येमेनच्या हौती बंडखोरांकडून क्षेपणास्त्रहल्ला; दोघांचा मृत्यू

बेंगळुरूत पाण्याची भीषण टंचाई

आरोपी मेहताला १९९९ मध्ये न्यायालयाने फरारी गुन्हेगार म्हणून घोषित केले होते. प्रवक्त्याने सांगितले की, सीबीआयच्या ग्लोबल ऑपरेशन सेंटरने इंटरपोलच्या माध्यमातून त्याचा पाठलाग केला. अखेरीस नॅशनल सेंट्रल ब्युरो, वॉशिंग्टनने त्याला शोधून काढले.आरोपीला भारतात आण्यासाठी सीबीआयने इंटरपोलच्या माध्यमातून अमेरिकेशी संपर्क साधला आहे.

Exit mobile version