सरगम कौशल या महिलेने मिसेस वर्ल्ड २०२२ चे विजेतेपद पटकवून इतिहास रचला. भारताने दोन दशकांनी सौंदर्य स्पर्धेत हा किताब जिंकला. ६३ देशांतील स्पर्धकांवर मात करत सरगमने लास वेगासमध्ये झालेल्या या स्पर्धेत हा मुकुट मिळवला.
मिसेस वर्ल्डने हीच पोस्ट तिच्या वैयक्तिक इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. “दीर्घ प्रतीक्षा आता संपली आहे, २१ वर्षांनंतर हा मुकुट घरी परतला आहे !” असे त्या पोस्ट खाली लिहिण्यात आले. जेव्हा विजेत्याची घोषणा करण्यात आली तेव्हा स्पर्धेचे अंतिम क्षण ही त्यांनी त्या व्हिडिओमध्ये कॅप्चर केले आहेत.
https://www.instagram.com/mrsindiainc/?utm_source=ig_embed&ig_rid=ac8157b9-999d-4583-885b-b4b7aa08bf44
सरगम ही एक मॉडेल, चित्रकार आणि आशय लेखक आहे. तिने इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर पदवी तसेच शिक्षणात बॅचलर पदवी घेतली आहे. कौशलचे वडील माजी बँकर आहेत. जीवनात तिच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यास तिच्या वडिलांनी तिला प्रवृत्त केले. सरगम ही मुंबईची रहिवासी असून तिचे लग्न नौदलाच्या एका अधिकाऱ्याशी झाले आहे. मिसेस इंडिया स्पर्धेदरम्यान तिच्या आयुष्यातील सर्वात “सुंदर आणि आनंददायी” अध्यायाबद्दल विचारले असता, तिने असे उत्तर दिले, “माझं लग्न हे माझ्यासाठी सर्वात सुंदर आणि आनंददायी क्षण आहे. कारण माझे पती हे नौदलात अधिकारी आहेत. आम्ही नेहमी एकमेकांच्या मदतीसाठी तत्पर असतो आणि त्यामुळे त्याच्या कडून मला खूप काही शिकायला मिळते. तो माझी सपोर्ट सिस्टम आहे “.
तिच्या विजयाची बातमी सोशल मीडियावर पोहोचल्यापासून लोक तिच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी विविध पोस्ट शेअर करत आहेत. या पोस्टमध्ये माजी मिसेस वर्ल्ड डॉ. अदिती गोवित्रीकर यांचाही समावेश आहे, ज्यांनी २१ वर्षांपूर्वी विजेतेपद पटकावले होते. तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर तिने एक फोटो शेअर केला आहे. तिने ‘अभिनंदन’ लिहिले आणि तिचा आनंद आणि अभिमान व्यक्त केला..