24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषआफताब कोर्टात म्हणाला की, रागाच्या भरात मी केली श्रद्धाची हत्या

आफताब कोर्टात म्हणाला की, रागाच्या भरात मी केली श्रद्धाची हत्या

दिल्ली न्यायालयात दिली कबुली

Google News Follow

Related

श्रद्धा वालकर हत्याकांडाचा आरोपी आफताब अमिन पूनावालाने आपणच ही हत्या केल्याची कबुली दिल्लीतील साकेत न्यायालयात दिली आहे. न्यायालयाने त्याची पोलिस कोठडी आणखी ४ दिवस वाढविली आहे.

आफताबने आपण रागाच्या भरात हे कृत्य केल्याची कबुली दिली आहे. आफताबने रागाच्या भरात हे कृत्य केले असल्याचे म्हटले असले तरी त्याने ज्या पद्धतीने तिच्या शरीराचे ३५ तुकडे करून नंतर ते फ्रीजमध्ये ठेवले आणि एकेक करून ते वेगवेगळ्या ठिकाणी फेकले यावरून तो विकृत मानसिकतेचाही आहे, हेदेखील स्पष्ट होत आहे.

आफताबची पॉलिग्राफ टेस्टही केली जाणार आहे. आता आफताबने या हत्येनंतर श्रद्धाच्या शरीराचे तुकडे करण्यासाठी जी हत्यारे वापरली त्याचा शोध पोलिस घेत आहेत. श्रद्धाचे शीर, तिचे कपडे आणि फोन अद्याप मिळालेला नाही. पोलिसांना काही हाडे सापडली असून त्याची अद्याप डीएनए चाचणी व्हायची आहे.

हे ही वाचा:

इंडोनेशिया भूकंपाने हादरले, शेकडो घरांची पडझड , १६२ ठार

उद्धव ठाकरे गटाला पडणार पुन्हा खिंडार, कोण कोण जातंय?

पाच लाखांचे बक्षीस असलेल्या खलिस्तानी दहशतवाद्याला दिल्ली विमानतळावर अटक

श्रद्धा हत्या प्रकरण उघडकीस आल्यापासून आफताबचे कुटुंब गायब

 

महाराष्ट्रातील पालघर येथून दिल्ली पोलिसांना दोन जणांचे जाबजबाबही मिळाले आहेत. २०२०मध्ये आफताबने तिला मारहाण केली तेव्हा तिला ज्यांनी मदत केली, त्यांचे हे जबाब आहेत.

दरम्यान, या प्रकरणाची चौकशी दिल्ली पोलिसांकडून सीबीआयकडे देण्यात यावी ही मागणी दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

दरम्यान, या हत्याकांडासंदर्भात पोलिस तपास करत असताना छतरपूर येथील भाड्याने घेतलेल्या घरात रक्ताचे डाग आढळले आहेत. स्वयंपाकघर आणि स्वच्छतागृहात हे डाग दिसले आहेत. अर्थात पोलिसांनी याला पुष्टी दिलेली नाही. आता याची न्यायवैद्यक चाचणी झाल्यानंतर त्यातून नक्की काय ती माहिती बाहेर येईल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा