मणिपूर, नागालँड आणि अरुणाचल प्रदेशमध्ये AFSPA सहा महिन्यांसाठी वाढवला!

केंद्रींय गृह मंत्रालयाने दिली माहिती 

मणिपूर, नागालँड आणि अरुणाचल प्रदेशमध्ये AFSPA सहा महिन्यांसाठी वाढवला!

केंद्र सरकारने मणिपूरमध्ये एक मोठे पाऊल उचलले आहे. केंद्राने १३ पोलीस ठाणे क्षेत्र वगळता संपूर्ण मणिपूरमध्ये सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा (AFSPA) लागू केला आहे. तसेच, नागालँडमधील आठ जिल्ह्यांमध्ये आणि इतर पाच जिल्ह्यांमधील २१ पोलिस स्टेशन क्षेत्रात AFSPA आणखी सहा महिन्यांसाठी वाढवण्यात आला. गृह मंत्रालयाने रविवारी (३० मार्च) ही माहिती दिली.

गृह मंत्रालयाने (MHA) जारी केलेल्या निवेदनानुसार, १३ पोलिस स्टेशन क्षेत्र वगळता संपूर्ण मणिपूर राज्यात सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा (AFSPA) लागू करण्यात आला आहे. अरुणाचल प्रदेशातील तिरप, चांगलांग आणि लोंगडिंग जिल्हे आणि राज्यातील तीन पोलिस स्टेशन क्षेत्रांमध्ये AFSPA सहा महिन्यांच्या कालावधीसाठी वाढविण्यात आल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. तसेच मणिपूरच्या १३ पोलीस ठाण्यांच्या क्षेत्रात AFSPA लागू केलेला नाही, यामध्ये इम्फाळ, लाम्फाळ, सिटी, सिंगजामी, पतसोई, वांगोई, पोरोमपत, हिंगांग, इरिलबुंग, थौबल, बिष्णुपू, नंबोल आणि काकचिंग यांचा समावेश आहे.

हे ही वाचा : 

संघ हा भारताच्या अमर संस्कृतीचा आधुनिक अक्षयवट, स्वयंसेवकांसाठी सेवा हेच जीवन!

बीजापूरमध्ये ५० नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

गुलवीर सिंहने कॅलिफोर्निया मीटमध्ये १० हजार मीटरचा राष्ट्रीय विक्रम मोडला

भाजप नेते राजीव चंद्रशेखर म्हणाले, मोहनलालचा एंपुरान पाहणार नाही!

दरम्यान, सुरक्षा दलांनी शनिवारी मणिपूरच्या डोंगराळ आणि खोऱ्यातील जिल्ह्यांच्या सीमावर्ती आणि संवेदनशील भागात शोध मोहीम सुरू केली आणि हा परिसर ताब्यात घेतला. इम्फाळ पोलिसांनी शोध मोहिमेत जप्त करण्यात आलेल्या वस्तूंची यादी जाहीर केली. यामध्ये एक देशी रायफल, एक बोल्ट ॲक्शन रायफल, एक .२२ पिस्तूल, एक देशी निर्मित मोर्टार (पॉम्पी-६ फूट), एक देशी निर्मित मोर्टार (पॉम्पी-५ फूट), एक देशी निर्मित मोर्टार (पॉम्पी-४ फूट), एक स्थानिक निर्मित हँडग्रेनेड, एक हेल्मेट, एक वायरलेस सेट, एक वायरलेस सेट चार्जर, एक एचई बॉम्ब, ५०० ग्रॅम गन पावडर जप्त करण्यात आली आहे.

...म्हणून मोंदीचा नागपूर दौरा ऐतिहासिक! | Mahesh Vichare | Modi In Nagpur |

Exit mobile version