अफगाणींचा पाकिस्तानी दूतावासावर हल्ला, पाकचा ध्वज उतरवला !

व्हिडिओ व्हायरल

अफगाणींचा पाकिस्तानी दूतावासावर हल्ला, पाकचा ध्वज उतरवला !

अफगाणिस्तानच्या नागरिकांनी जर्मनीतील पाकिस्तानच्या दूतावासावर हल्ला केला आहे. अनेक अफगाणींनी दूतावासात घुसून तोडफोड केली. तसेच पाकिस्तानचा ध्वजही उतरवला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या जर्मनीतील फ्रँकफर्ट येथील पाकिस्तानी वाणिज्य दूतावासाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तेथे उपस्थित असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांशी अफगाण नागरिकांची चकमकही झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यावेळी अफगाणींनी पाकिस्तानचा झेंडा खाली उतरावल्याचेही व्हिडिओमध्ये दिसत आहे. या प्रकरणी जर्मन पोलिसांनी काही लोकांना अटक केली आहे.

परिस्थिती पाहता पाकिस्तानने कराचीतील जर्मन वाणिज्य दूतावासाची सुरक्षा वाढवली आहे. तसेच सुरक्षेच्या कारणास्तव ते तात्पुरते बंद करण्यात आले आहे, तथापि, या हल्ल्यामागील खरे कारण अद्याप समोर आलेले नाही. अफगाण निर्वासितांना परत अफगाणिस्तानात पाठवल्यामुळे लोक पाकिस्तानवर नाराज असल्याचे काही मीडिया रिपोर्ट्समध्ये मानले जात आहे. त्यामुळे लोक हंगामा करत असल्याचे मानले जात आहे.

हे ही वाचा..

बांगलादेश हिंसाचार; ‘दिसताच क्षणी गोळ्या घाला’

ग्रँटरोडमधील व्यवसायिकाला बनावट शिल्पे विक्रीकरुन २२ लाखांची फसवणूक

केदारनाथ पदयात्रा मार्गावर दरड कोसळली, तिघांचा मृत्यू !

विकास प्रकल्प रद्द करणे हीच उद्धव ठाकरेंची खासियत !

या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पाकिस्तानने देखील याची निंदा केली आहे. पाकिस्तानी टीव्ही होस्ट नजीबा फैज यांनीही हा व्हिडिओ रिट्विटकरत ही घटना अफगाण लोकांना धोकादायक, हिंसक, बेजबाबदार असल्याचे दाखवते, असे म्हटले आहे.

Exit mobile version