पाकिस्तान विरुद्ध विजयाचा आनंद श्रीलंकेपेक्षा अफगाणिस्तानला जास्त

आशिया कप २०२२ स्पर्धेमधील पाकिस्तानच्या पराभवाचा जल्लोष अफगाणिस्तानमध्ये करण्यात आला.

पाकिस्तान विरुद्ध विजयाचा आनंद श्रीलंकेपेक्षा अफगाणिस्तानला जास्त

दुबईमध्ये नुकतीच ‘आशिया कप २०२२’ स्पर्धा पार पडली. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानला धूळ चारत आशिया कपवर आपले नाव कोरले. २०१४ नंतर श्रीलंकेने आशिया चषक जिंकला आहे. श्रीलंकेने पाकिस्तानचा २३ धावांनी पराभव करत सहाव्यांदा विजेतेपद पटकावले. मात्र, या विजयानंतर वेगळंच चित्र होतं. श्रीलंकेच्या विजयाचा जास्त आनंद श्रीलंकेपेक्षा अफगाणिस्तानला जास्त झाल्याचं चित्र होतं.

या सामन्यात पाकिस्तानच्या या पराभवाचा जल्लोष अफगाणिस्तानमध्ये करण्यात आला. श्रीलंकेच्या या विजयामुळे अफगाण नागरिक भलतेच खुश झाले आहेत. अफगाणिस्तानच्या काबूलमध्ये त्यांनी या विजयाचा जल्लोष केला. अफगाण नागरिकांनी रस्त्यावर उतरून फटाके, नाच आणि रॅली काढून त्यांनी श्रीलंकेचा विजय साजरा केला.

या जल्लोषाचे कारण ठरले ते अफगाणिस्तानचा सामना सुपर ४ मध्ये पाकिस्तानशी झाला होता. या सामन्यात जवळ जवळ अफगाणिस्तान हा सामना जिंकत होता. परंतु, शेवटच्या षटकात दोन षटकार मारून पाकिस्तानने त्यांच्या विजयावर पाणी फेरले. अफगाणिस्तानचे जलद गोलंदाज फरीद अहमदने शेवटच्या षटकात पाकचा फलंदाज असिफ अलीला अपशब्द वापरले. असिफ अल्ली तात्काळ त्याला मारण्यासाठी त्यांच्या अंगावर धावला आणि इथेच या वादाची ठिणगी पडली. स्टेडियममध्ये दोन्ही गटांच्या चाहत्यांची हाणामारी झाली. एकमेकांवर खुर्च्या फेकण्यात आल्या. त्याचाच राग म्हणून श्रीलंकेला जेवढा आनंद झाला नाही तेवढा आनंद अफागाणिस्तानला झाला.

या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेची सुरुवात अडखळत झाली. भानुका राजपक्षे आणि वानिंदू हसरंगा यांच्या तडाखेबंद फलंदाजीने श्रीलंकेने १७० धावापर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात पाकिस्तान सर्वबाद १४५ धावापर्यंत मजल मारू शकला.

हे ही वाचा:

“शरद पवार म्हणजे साडेतीन जिल्ह्याचे अझीम ओ शान शेहेनशाह”

पंतप्रधान मोदींच्या या १२०० वस्तूंचा होणार लिलाव

पंतप्रधान मोदींच्या या १२०० वस्तूंचा होणार लिलाव

राडा करणाऱ्या शिवसैनिकांना उद्धव ठाकरे यांची शाबासकीची थाप

या विजयात सिंहाचा वाटा होता तो श्रीलंकेचे भानुका राजपक्षे आणि वानिंदू हसरंगा यांचा. राजपक्षेने पाकच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत ७१ धावा कुटल्या. हसरंगाने तुफान फटकेबाजी करत अवघ्या २१ चेंडूत ३६ धावा करून त्याला चांगली साथ दिली. हसरंगाने जशी फलंदाजीत छाप पाडली तशीच छाप त्याने गोलंदाजीतही दाखवली. त्याने एका ओव्हरमध्ये ३ विकेट्स घेऊन पाकिस्तानचे कंबरडे मोडले आणि इथेच पाकिस्तान सुफडा साफ झाला. हसरंगाने १७ व्या षटकात सेट झालेल्या रिजवानला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर आसिफ अली, खुशदिल शाह यांना माघारी परतवले. सामन्याचा हा टर्निंग पॉईंट ठरला आणि पाकिस्तान त्यातून सावरलाच नाही.

Exit mobile version