अफगाणिस्तानने इंग्लंडला धुतल्यानंतर वर्ल्डकपचा तक्ता बदलला

अफगाणिस्तानचा हा विश्वचषक इतिहासातील केवळ दुसरा विजय

अफगाणिस्तानने इंग्लंडला धुतल्यानंतर वर्ल्डकपचा तक्ता बदलला

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अफगाणिस्तानने रविवारी इंग्लंडवर खळबळजनक विजय मिळवल्यानंतर सर्व देशांच्या गुणांमध्ये मोठे फेरबदल झाले आहेत. गतविजेता इंग्लंडचा संघ पहिल्या चार संघांत स्थान मिळवण्यात अपयशी ठरला आहे. या विजयामुळे अफगाणिस्तानने खाते उघडले आहेच, शिवाय त्यांच्या विजयामुळे पाकिस्तानच्या संघाचेही चौथे स्थान कायम राहिले आहे. तर, भारतीय संघाने अव्वल स्थान कायम राखले आहे. अफगाणिस्तानचा हा विश्वचषक इतिहासातील केवळ दुसरा विजय आहे. याआधी सन २०१५मध्ये अफगाणिस्तानने स्कॉटलंडला पराभूत केले होते.

 

इंग्लंडवर ऐतिहासिक विजयामुळे अफगाणिस्तानचा संघ सहाव्या स्थानी पोहोचला आहे. अफगाणिस्तानचा हा तीन सामन्यांतील पहिला विजय आहे. तर, त्यांचा रनरेट -०.६५२ आहे. तर, जोस बटलरचा इंग्लंड संघ पाचव्या स्थानी आहे. या कामगिरीचा पाकिस्तानलाही फायदा झाला आहे. त्यांचे अव्वल चार संघांमधील स्थान कायम राहिले आहे.

हे ही वाचा:

युएनच्या गाझा पट्टीतील कर्मचाऱ्याचा भावनिक संदेश व्हायरल

ट्रकला आरटीओने महामार्गावर थांबवल्याचा व्हिडीओ समोर; दोन अधिकारी अटकेत

नीरज चोप्राचे जागतिक ऍथलेटिक्स संघटनेकडून कौतुक!

मुंबईतील ताज हॉटेल बॉम्बने उडवून देण्याचा पोलिसांना फोन!

सर्वांत आश्चर्याची बाब म्हणजे पाचवेळा विश्वचषक जिंकणारा ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या दहाव्या स्थानी आहे. पॅट कमिन्सच्या संघाने आतापर्यंत विश्वचषक २०२३मध्ये दोन सामने जिंकले असून या दोन्ही सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर, रोहित शर्माचा भारतीय संघ तिन्ही सामने जिंकून अव्वल स्थानी कायम आहे. तर, तिन्ही सामने जिंकून न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या स्थानी आहे. तर, तिसऱ्या स्थानी दक्षिण आफ्रिकेचा संघ आहे. त्यांनी आतापर्यंत दोन सामने खेळले असून दोन्हीही जिंकले आहेत.

 

अफगाणिस्तानने पहिल्यांदा फलंदाजीला उतरून इंग्लंडसमोर २८५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ अवघ्या २१५ धावांत आटोपला.

Exit mobile version