वानखेडेंवरील प्रतिज्ञापत्रात फ्लॅट, महागडी घड्याळे, परदेश दौरे

एनसीबीने केले अनेक धक्कादायक खुलासे

वानखेडेंवरील प्रतिज्ञापत्रात फ्लॅट, महागडी घड्याळे, परदेश दौरे

New Delhi: Former Mumbai zonal director of the Narcotics Control Bureau Sameer Wankhede, who got a clean chit from the Mumbai district caste certificate verification committee, at the National Commision for Schedule Castes, in New Delhi, Tuesday, Aug 16, 2022. (PTI Photo) (PTI08_16_2022_000093B) *** Local Caption ***

नार्कोटिक्स कँट्रोल ब्युरोचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्याविषयी न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात अनेक गंभीर खुलासे करण्यात आले आहेत.दोन संशयितांना सोडण्याबरोबरच महागडी घड्याळे, परदेश दौरे आणि त्यातील खर्च, फ्लॅट्सची खरेदी अशा अनेक गोष्टी उघड करण्यात आल्या आहेत.ऑक्टोबर २०२१मधील क्रूझवरील अमली पदार्थ प्रकरणातील दोन संशयितांच्या सुटकेवर विशेष अंमलबजावणी पथकाचे प्रमुख आयपीएस अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांनी शंका उपस्थित केली आहे. एनसीबीचे तत्कालीन अधिकारी समीर वानखेडे यांनी घातलेल्या छाप्यादरम्यान सौम्या सिंहच्या बॅगेत रोलिंग पेपर सापडला असतानाही एनसीबीने तिची सुटका केल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.

अटक आरोपी मॉडेल मुनमुन धमेचा हिच्याच खोलीत ती होती. “संशयितांच्या सुटकेमध्ये समझोता केल्याचा आरोप या प्रतिज्ञापत्रात करण्यात आला आहे. तसेच, एक संशयित सिद्धार्थ शाह, ज्याने अरबाज मर्चंटला चरस पुरवल्याची कबुली दिली होती, त्यालाही जाण्याची परवानगी देण्यात आली. एनसीबीने मर्चंटकडून ६ग्रॅम चरस जप्त केल्याचा दावा केला होता.
सन २०१७ ते २१ दरम्यान वानखेडे यांनी कुटुंबीयांसह ब्रिटन, आयर्लंड, पोर्तुगाल, दक्षिण आफ्रिका आणि मालदिव आदी सहा देशांचे दौरे केले होते. ५५ दिवसांच्या एकूण दौऱ्यात त्यांनी सुमारे आठ लाख ७५ हजार रुपये खर्च केल्याचे जाहीर केले आहे. प्रत्यक्षात या खर्चात केवळ विमान तिकिटाचाच खर्च निघू शकतो.

हे ही वाचा:

ठाकरे, पवारांना निमंत्रण, केजरीवाल, केसीआरवर फुली

रफाएल नदाल पुढील वर्षी करणार टेनिसला अलविदा

उद्धव ठाकरेंचे व्यक्तिगत चांगले संबंध किती जणांशी? बुरे दिन यालाच म्हणतात..

हिंदू तरुणाची द भोपाळ स्टोरी; झाला सौरभचा सलीम

मालदिव ट्रिप

जुलै २०२१मध्ये वानखेडे आणि त्यांचा मित्र विरल राजन हे ताज एग्झोटिका मालदिव्ह्ज बीच सूट्समध्ये कुटुंबीय आणि नोकरासोबत राहिले होते. तिथे वानखेडे कुटुंबीयांचे साडेसात लाख रुपयांचे बिल झाले. एनसीबीच्या विशेष अंमलबजावणी पथकाकडून तपास सुरू झाला तेव्हा या हॉटेलचे बिल १८ डिसेंबर २०२१ रोजी राजन याच्या क्रेडिट कार्डद्वारे देण्यात आले.
राजन याच्याकडून पाच लाख ६० हजारांचे कर्ज घेतल्याचे वानखेडे यांनी एनसीबी किंवा ‘सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्स’ विभागाला कळवले नव्हते.
जेडीचा पार्टनर याला हॉटेल बुकिंगसाठी राजन याने नऊ लाखांची रोकड दिली होती. त्यामुळे याबाबतही आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे.

ब्रिटनची ट्रिप

१९ दिवसांच्या लंडन ट्रिपच्या मानाने जाहीर केलेल्या एक लाख रुपये खर्चाची तुलना होत नाही.

महागडी घड्याळे

वानखेडे यांनी २२ लाख ५० हजारांचे रोलेक्स गोल्ड घड्याळ विकत घेतले होते. त्यासाठी १७ लाख ४० हजारांचे कर्ज वानखेडे याने राजन याच्याकडून घेतले होते. त्यातील एका बिल २२ लाख ५० हजारांचे तर, दुसरे बिल २० लाख ५३ हजारांचे आहे.वानखेडे याची पत्नी क्रांती हिच्या नावे राजन याला सात लाख ४० हजारांची चार घड्याळे विकण्यात आली होती. विक्री केल्या गेलेल्या घड्याळांसाठी लगेचच रक्कम कशी मिळाली आणि त्याच्याकडून २२ लाखांचे घड्याळ विकत घेण्यासाठी क्रेडिटची सुविधा कशी मिळाली?

मालमत्ता

मुंबईमध्ये चार फ्लॅट. वाशिमला ४.२ एकरची जागा. त्यांच्या गोरेगाव येथील पाचव्या फ्लॅटसाठी ८२ लाख ९० हजार रुपये खर्च केल्याचा आरोप. या फ्लॅटची अंदाजित रक्कम अडीच कोटी. त्यांनी जाहीर केलेल्या मालमत्ता आणि अन्य कागदपत्रांमध्ये तफावत.
वानखेडे यांच्या मते, त्यांची पत्नी क्रांती हिने लग्नाआधी, फेब्रुवारी २०१७मध्ये या फ्लॅटमध्ये सव्वा कोटीची गुंतवणूक केली होती. मात्र सन २०१६-१७मधील आयटी रिटर्नची कागदपत्रे सादर न केल्याने या पैशांचा स्रोत अज्ञात.
१ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च, २०२० या कालावधीतील आयटी रिटर्ननुसार, वानखेडे यांचे उत्पन्न ३१ लाख ५६ हजार रुपये होते. तर, त्यांची पत्नी क्रांती हिचे उत्पन्न १४ लाख पाच हजार रुपये होते. तर, दोघांच्या नोंद न केलेल्या व्यवहारांची रक्कम (मालदीव ट्रिप सात लाख २५ हजार आणि रोलेक्स घड्याळ २२ लाख पाच हजार) २९ लाख तीन हजार आहे.

Exit mobile version