28 C
Mumbai
Wednesday, January 15, 2025
घरविशेषगरजू कैद्यांसाठी वकिलांचे ‘दर्द से हमदर्द तक’

गरजू कैद्यांसाठी वकिलांचे ‘दर्द से हमदर्द तक’

कैद्यांना मिळतो कायदेशीर मदतीचा हात

Google News Follow

Related

मुंबईतील वडाळा येथे आजोबांची हत्या करण्याच्या आरोपाखाली त्यांच्या २१ वर्षीय नातवाला अटक करण्यात आली होती. सुशांत सातपुते असे नातवाचे नाव आहे. अंमली पदार्थांचे सेवन करण्यासाठी पैसे मागण्यावरून हा वाद झाल्याचे सांगण्यात येत होते. यानंतर आजोबांच्या हत्येचा आरोप असलेल्या २१ वर्षीय आरोपीला सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. आरोप निश्चित करताना न्यायालयाने त्याला विचारले की, तो दोषी आहे का? त्यावर तो हो म्हणाला आणि रडू लागला. न्यायालयाकडून त्याच्याकडे अधिकची चौकशी केली असता त्याने सांगितले की, तो निर्दोष आहे आणि या प्रकरणामुळे त्याच्या आई-वडिलांनी त्याच्याशी संबंध तोडले आहेत. कोणीही त्याचे ऐकत नाही. त्यामुळे तो हा खटला लढविण्यास तयार नाही.

यावर पर्याय म्हणून न्यायालयाने त्यांना माहित असलेल्या एका एनजीओकडे हे प्रकरण दिले. ‘दर्द से हमदर्द तक’ या स्वयंसेवी संस्थेने हे प्रकरण समाजहिताच्या दृष्टीने हाताळले. हा खटला सुरू असताना संबंधित व्यक्तीची (आजोबांची) हत्या झाली तेव्हा आरोपी म्हणजेच सुशांत घरात उपस्थित नव्हता, असे पुराव्यादरम्यान उघड झाले. पोलिसांनी आजोबांच्या खोलीत चोरी होऊ शकते या बाजूने तपास केला नसल्याचे समोर आले. अखेर १० साक्षी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे, अशी माहिती वकील प्रकाश साळसिंगीकर यांनी दिली आहे. तुरुंगातील अंडरट्रायल तसेच आर्थिक चणचण असलेल्या कैद्यांना वकील साळसिंगीकर एका एनजीओच्या माध्यमातून कायदेशीर मदत पुरवतात.

अनेकदा तुरुंगातील अंडरट्रायल तसेच गरीब कैद्यांना आर्थिक चणचणीमुळे तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग सापडत नाही. अशा कैद्यांसाठी काही वकिलांनी पुढाकार घेतला असून त्यांच्या मदतीसाठी ते पुढे सरसावले आहेत. या वकिलांनी ‘दर्द से हमदर्द तक’ या स्वयंसेवी संस्थेचा एक भाग म्हणून एकत्र येत खटल्यातील आरोपींना जामीन मिळवून देण्यासाठी, त्यांच्या जामीनाची व्यवस्था करण्यासाठी आणि तुरुंगात बराच वेळ घालवल्यानंतर छोट्या गुन्ह्यांमध्ये अटक केलेल्यांची सुटका करण्यात मदत केली आहे.

वकील प्रकाश साळसिंगीकर हे अन्य २० वकिलांसह हे काम करत आहेत. राज्य सरकारकडून परवानगी मिळाल्यानंतर हे वकील राज्यातील तुरुंगांना भेटी देतात आणि ज्या कैद्यांना त्यांच्या मदतीची गरज आहे त्यांची माहिती हे वकील गोळा करतात, अशा पद्धतीने ‘दर्द से हमदर्द तक’ या स्वयंसेवी संस्थेचे काम सुरू असते. या संस्थेने गेल्या तीन वर्षांत ५०० हून अधिक कैद्यांना मदत देऊ केली आहे. हे वकील आठवड्यातून तीन वेळा आर्थर रोड कारागृह, ठाणे कारागृह आणि पुण्यातील येरवडा कारागृहात भेट देतात. भायखळा महिला कारागृहात देखील या वकिलांची फौज पंधरवड्यातून एकदा भेट देत असते.

या तुरुंगांना भेट दिल्यानंतर ते कैद्यांना भेटतात, त्यांच्या केस पेपर्सचा अभ्यास करतात आणि त्यानुसार त्यांना मदत देतात. त्यांची संस्था गेल्या मे महिन्यात एनजीओ म्हणून नोंदणीकृत झाली होती. वकील प्रकाश साळसिंगीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बहुतेक अंडरट्रायल हे एकतर कायद्यांतर्गत त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या उपायांबद्दल जागरूक नसल्यामुळे किंवा त्यांच्या गरीब आर्थिक परिस्थितीमुळे योग्य कायदेशीर सहाय्य मिळवण्यात अपयशी ठरतात.

दोन मुलींची आई असलेल्या एका महिलेने पुन्हा गर्भधारणा करण्यास भाग पाडल्यानंतर पतीची हत्या केल्याच्या आरोपाखाली चार वर्षांपेक्षा जास्त काळ तुरुंगात काढला. तिने या एनजीओला भेट दिली आणि तिच्या वकिलाच्या मदतीने या वर्षाच्या सुरुवातीला मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मिळवला. “मी या एनजीओकडे येईपर्यंत मला बाहेरून कोणतीही मदत मिळाली नाही. मी सुशिक्षित आहे म्हणून मी तुरुंगात कार्यालयीन कामात वेळ घालवला पण इतर अनेकांसाठी जीवन खूप कठीण आहे,” अशा भावना तिने व्यक्त केल्या.

हे ही वाचा:

मुख्तार अन्सारीचा प्रवास; स्वातंत्र्य चळवळ, वीरचक्र मिळविणाऱ्या कुटुंबातला मुलगा ते गुन्हेगार

डीपफेक हे मोठं आव्हान; एआय जनरेटेड गोष्टींवर वॉटरमार्क हवा

वकिलांच्या पत्रानंतर पंतप्रधान मोदी यांची काँग्रेस नेत्यांवर टीका

२०५० पर्यंत सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारत उदयास येणार

मानखुर्द येथील फयाल शेख या रोजंदारी मजुराला दोन वर्षे तुरुंगवास भोगावा लागला होता. लघवी करण्यावरून भांडण झाल्यानंतर एका व्यक्तीला ठार मारल्याच्या आरोपाखाली फयाल याला अटक करण्यात आली. त्याच्या आईने सांगितले की या संस्थेच्या वकिलांनी त्यांच्याशी संपर्क साधून त्याची केस लढण्यापूर्वी त्यांनी सर्व आशा सोडून दिल्या होत्या. फयाल याला गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला शिवाय संबंधित व्यक्तीच्या मृत्यूचे कारण भांडणात झालेल्या दुखापती नसून आधीपासून अस्तित्वात असलेल्या वैद्यकीय परिस्थितीमुळे होते, असेही लिहिले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
222,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा