दिव्यांग महिलांसाठी अत्याधुनिक शिलाई मशिन्स

वाढदिवसादिवशी आमदार भातखळकर यांची अनोखी भेट

दिव्यांग महिलांसाठी अत्याधुनिक शिलाई मशिन्स

वाढदिवसाचा कसलाही इव्हेंट न करता सामाजिक आणि त्यातल्या त्यात गरजूना मदत करण्याची परंपरा यंदाही भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी कायम ठेवली. आपल्या वाढदिवशी तसेच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून चाळीसगाव येथील दिव्यांग महिलांना स्वावलंबी बनवणाऱ्या स्वयंदीप संस्थेला त्यांनी अत्याधुनिक शिलाई मशीन्सचे वाटप केले.
स्वयंदीप ही संस्था दिव्यांग महिलांना टेलरिंगचे प्रशिक्षण देऊन स्वावलंबी बनवण्याचे काम करते. गेल्या काही वर्षात शेकडो महिलांना उत्तम दर्जाचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले आहे. या संस्थेचे कार्य निरपेक्ष भावनेने सुरु आहे. त्यामुळे या संस्थेत प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांना बदलत्या काळात तंत्रज्ञावर आधारित शिलाई मशीन्स देण्याचा निर्णय आमदार अतुल भातखळकर यांनी घेतला. वाढदिवस आणि महिला दिन असा दुहेरी योग साधून त्यांनी शिलाई मशिन्स संस्थेला दिल्या.

हेही वाचा..

खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा व्हिडिओ समोर

मालदीवचे माजी राष्ट्रपती नशीद यांनी भारताची मागितली माफी

राहुल गांधी पुन्हा वायनाडमधूनच लढणार

या पूर्वी सुद्धा त्यांनी वाडा तालुक्यातील दुर्गम भागात राहणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थीनींना भारतीय पोस्ट खात्याच्या ‘सुकन्या समृद्धी योजने’ ची खाती काढून त्यांचा हफ्ताही भरला होता. त्याचप्रमाणे यंदा त्यांनी दिव्यांग महिलांना शिलाई मशिन्स दिली आहेत. त्यांच्या या कार्याचे कौतुक होत असून चाळीसगावच्या स्वयंदीप संस्थेच्या विश्वस्त मीनाक्षी निकम यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

Exit mobile version