27 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरविशेषअ‍ॅडॉल्फ हिटलरच्या घड्याळाची ११ लाख डॉलरला विक्री

अ‍ॅडॉल्फ हिटलरच्या घड्याळाची ११ लाख डॉलरला विक्री

Google News Follow

Related

जर्मनीचे हुकुमशहा अ‍ॅडाल्फ हिटलर यांच्या मनगटी घड्याळाची अमेरिकेतील मॅरिलँड या लिलाव कंपनीने ११ लाख डॉलरला विक्री केली आहे. ४ मे १९४५ रोजी एका फ्रेंच सैनिकाने हे घड्याळ युद्धातील लुटीचे सामान म्हणून जप्त केले होते. असे या लिलाव कंपनीने म्हटले आहे.

चेसापीक शहरातील ऐतिहासिक वस्तूंचा लिलाव करणार्‍या अलेक्झांडर हिस्टोरिकल ऑक्शन्सने या घड्याळाचे ऐतिहासिकदृष्ट्या द्वितीय विश्वयुद्धाचे अवशेष म्हणून वर्णन केले. या घड्याळाची २० ते ४०लाख डॉलरच्या दरम्यान त्याची किंमत ठेवली होती, येथील माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार यहुदी नेते आणि काही लोकांनी या घड्याळाचे कोणतेही ऐतिहासिक मूल्य नसल्याचे सांगून या आठवड्यात झालेल्या घड्याळाच्या लिलावावर आक्षेप घेतला होता.

हे ही वाचा:

“पाकिस्तानी खेळाडू पदकं जिंकत आहेत हे नेत्यांना माहित आहे का?” पाक पत्रकाराचा सवाल

क्रिकेटमध्ये महिलांची ऐतिहासिक कामगिरी; रौप्यपदकावर कोरलं नाव

अमृता फडणवीस यांना ‘त्या’ गाण्यात का दिसला उद्धव ठाकरेंचा चेहरा

केजरीवाल यांचे ‘फुकट’चे उद्योग

घड्याळाबरोबरच इतरही सामान

लिलाव संस्थेने म्हटले आहे की ४ मे १९४५ रोजी फ्रान्सच्या सैनिकांनी हिटलर यांच्या बर्गहोप घरावर हल्ला केला त्यावेळी त्यांनी हे घड्याळ लुटले होते. हिटलरला हे घड्याळ २० एप्रिल १९३३ रोजी जर्मनीचे चान्सलर झाल्यावर देण्यात आले होते. हे घड्याळ अ‍ॅडॉल्फ हिटलर यांचे असल्याचा दावा या लिलाव कंपनीने केला होता. या घड्याळाबरोबरच हिटलच्या पत्नी इव्हा ब्राऊन यांचा एक ड्रेस आणि हिटलच्या अधिकाऱ्यांची स्वाक्षरी असलेली काही चित्रेही अन्य सामानाबरोबर होती असे म्हटले जाते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा