31 C
Mumbai
Friday, October 25, 2024
घरविशेषआदित्य ठाकरेंची गडगंज संपत्ती, भातखळकर म्हणाले, वाझे प्रसन्न...

आदित्य ठाकरेंची गडगंज संपत्ती, भातखळकर म्हणाले, वाझे प्रसन्न…

भाजपा आमदार अतुल भातखळकरांच्या ट्वीटची चर्चा

Google News Follow

Related

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी (२४ ऑक्टोबर) वरळी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत वडील उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, आई रश्मी ठाकरे, भाऊ तेजस ठाकरे उपस्थित होते. यावेळी आदित्य ठाकरेंनी सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रात आपल्या संपत्तीचा उल्लेख केला आहे. प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार, आदित्य ठाकरेंची गडगंज संपत्ती असल्याचे समोर आले आहे. यावरून भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी ट्वीटकरत आदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे.

आदित्य ठाकरे यांच्या नावावर रायगड येथे काही एकर जागा असून ज्याची बाजार मूल्य किंमत १ कोटी ४८ लाख ५१ हजार ३५० रुपये इतकी आहे. ठाकुर्ली आणि घोडबंदर येथे २ दुकानाचे गाळे ज्याचे बाजारमूल्य ४ कोटी ५६ लाख रुपये आहे.  तसेच BMW चार चाकी वाहन, १ कोटी ९१ लाख ७ हजार १५९ रुपयांचे दागिने.

हे ही वाचा : 

खलिस्तानी दहशतवादी बलजीत सिंगला अटक!

पुण्यातून नाकाबंदीदरम्यान सापडले १३८ कोटींचे सोनं

जेएनयूमध्ये होणारी इराण, पॅलेस्टाईन, लेबेनॉनच्या भारतातील राजदूतांची व्याख्याने रद्द

“भारत आणि जर्मनीमधील मैत्री प्रत्येक टप्प्यावर, आघाडीवर अधिक घट्ट होतेय”

याच बरोबर जंगम मालमत्ता – १५ कोटी ४३ लाख ३ हजार ६०, अचल मालमत्ता – ६ कोटी ४ लाख ५१ हजार ३५० रुपये,  बँक खात्यात २ कोटी ४४ लाख १९ हजार ९८५ रुपये, बँक खात्यात फिक्स डिपॉसिट – २ कोटी ८१ लाख २० हजार ७२३ रुपये आहेत.

तसच शेअर मार्केट गुंतवणूक – ७० हजार, म्युच्युअल फंड – १० कोटी १३ लाख ७८ हजार ५२ रुपये,  बॉण्ड्स – ५० हजार रुपये,  एकूण गुंतवणूक (स्वतः) – १० कोटी १४ लाख ९८ हजार ५२ रुपये, LIC पॉलिसी – २१ लाख ५५ हजार ७४१ रुपये आहेत. दरम्यान, आदित्य ठाकरेंची डोळे दिपवणारी संपत्ती पाहून भाजपा आमदार यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावत ‘वाझे प्रसन्न…’, असे लिहिले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
185,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा