शिवसेना उबाठा गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आज (९ जानेवारी ) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत भेटीमध्ये झालेल्या चर्चेवर भाष्य केले. या भेटीमध्ये दोन विषयांवर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आमच्या मागण्या पूर्ण झाल्याकी आम्हीही फडणवीसांचे कौतुक करू असे आदित्य ठाकरे म्हणाले.
आदित्य ठाकरे म्हणाले, पोलीस कॅम्पमध्ये जे निवृत्त पोलीस राहत आहेत त्यांना लावण्यात आलेल्या दंडनीय शुल्कावर स्थगिती आणण्याची मागणी केली आहे. २० रुपये प्रति चौरस फूट दंड शुल्क १५० रुपये झालेला आहे. हा दंड निवृत्त पोलिसांना परवडत नसल्याने यावर स्थगिती आणावी अथवा सुरवातीचा २० रुपये शुल्क दंड ठेवावा.
निवृत्त पोलिसांना मुंबईतच घरे द्यावीत अशी दुसरी मागणी केली. कुर्ला, नायगाव, वरळी, माहीम, मरोळ मधील असलेल्या काही पोलीस इमारती दुरुस्तीला आलेल्या आहेत. तर काही नवीन बांधायच्या आहेत. त्यासाठी निधीची तरतूद करण्यात यावी अशी मागणीही केली आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.
हे ही वाचा :
१९५४च्या कुंभमेळ्यात नेहरू आले आणि चेंगराचेंगरीत १००० लोक मेले!
विधानसभा निवडणूक ‘हातचा मळ’ समजण्याची चूक केली!
अलिगडमध्ये लाऊडस्पीकर हटाव मोहीम तेजीत; ११२ ठिकाणी ‘आवाज बंद’
लॉस एंजेलीसमधील आगडोंबामुळे १ लाख लोकांना घर सोडण्याच्या सूचना
ते पुढे म्हणाले, आमच्या सरकारच्या काळात ‘सर्वांसाठी पाणी’ ही योजना आणली होती. यामध्ये कोणतीही गृहनिर्माण संस्था, झोपडपट्टी, अशा सर्व हौसिंग सोसायटी असतील त्यांचे लीगल स्टेटस न पाहता त्यांना पाणी देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. मात्र, मागील सरकारने योजनेवर स्थगिती आणली. सरकार बदललेले आहे, नव्या सरकारमध्ये सत्ताधारी आणि विरोधक मिळून जनहिताची कामे एकत्रित येवून करू शकेल, असे आम्हाला आश्वासन मिळाले आहे. एका चांगल्या हेतूने आम्ही इथे आलो आहोत. तसेच सर्वांसाठी पाणी ही योजना मुंबईत लगेच सुरु करावी अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली.
टोरोस घोटाळ्यावरही चर्चा केल्याचे आदित्य ठाकरेंनी सांगितले. या प्रकरणी लवकरात लवकर पुढील कारवाई करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मुंबईतल्या गिरणी कामगारांच्या घरांसाठी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसला जाणार आहेत. या दौऱ्यानंतर आम्हाला बैठकीसाठी वेळ देण्यात आली आहे. सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे तुम्ही काय सांगाल? असा प्रश्न यावेळी त्यांना विचारला आला. यावर आदित्य ठाकरे म्हणाले, आमच्या या मागण्या पूर्ण झाल्या की आम्हीही देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करू.