भारताच्या यशस्वी चांद्रयान मोहिमेनंतर आता इस्रोचे यान सूर्याच्या दिशेने रवाना होणार आहे. ऑगस्ट महिन्यात चांद्रयान-३ चे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग करण्यात आले. त्यानंतर इस्रो तातडीने सूर्य मोहिमेच्या तयारीला लागले. आदित्य L1 ही मोहीम भारताची पहिली सूर्य मोहीम आहे. शनिवार, २ सप्टेंबर रोजी या दिवशी सूर्य मोहिमेला सुरुवात होणार आहे.
चंद्रावर पोहचण्याचा प्रवास हा सूर्याकडे पोहचण्याच्या प्रवासाच्या तुलनेत सोपा होता. मात्र, आता सूर्यापर्यंतच अंतर कापण सोपं नाही. असे असले तरी या मोहिमेचे बजेट हे चांद्रयान मोहिमेपेक्षा कमी असल्याची माहिती समोर आली आहे. आदित्य L1 चे बजेट हे ४०० कोटी रुपये आहे. चांद्रयान-३ च्या तुलनेत या मोहिमेचा खर्च २०० कोटीने कमी आहे. चांद्रयान-३ मोहिमेसाठी ६१५ कोटींचा खर्च आला होता. तर, विशेष बाब म्हणजे अमेरिकेची आंतराळ संस्था नासा हिच्या सूर्य मोहीमेपेक्षा इस्रोचे ही मोहीम ९७ टक्के स्वस्त आहे.
भारत सूर्याची पहिली मोहीम यशस्वी करण्यास तयार आहे. आदित्य L1 सतीश धवन अवकाश तळावरुन लॉन्च करण्यात येईल. PSLV-C57 रॉकेट आदित्य L1 सॅटेलाइटला पृथ्वीच्या लोअर ऑर्बिटमध्ये सोडेल. सकाळी ११.५० मिनिटांनी या यानाचे लॉन्चिंग होईल. सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये L1 बिंदू असून त्याला हॅलो ऑर्बिट म्हटलं जातं. तिथे आदित्य L1 ला स्थापित केलं जाईल. सूर्याबद्दलची अनेक रहस्य या मोहिमेच्या माध्यमातून उलगडण्यात यश येणार आहे.
आदित्य L1 मोहिम पाच वर्षे कार्यरत राहणार आहे. त्यामुळे तितका काळ हा उपग्रह सूर्याभोवती भ्रमण करेल. सूर्यावर येणारी वादळं, सौर कोरोना आणि अन्य घटकांबद्दल माहिती मिळेल. यानाने पृथ्वीभोवती फेऱ्या मारल्यानंतर १५ लाख किलोमीटर अंतरावर असलेल्या L1 पॉइंटच्या दिशेने जाईल. त्या पॉइंटवर फिरताना आदित्य L1 सूर्याच्या बाहेरील थराबद्दल माहिती देईल.
हे ही वाचा:
जेट एअरवेजचे नरेश गोयल यांना अटक
एका महिलेच्या मानसिक त्रासाला कंटाळून सुधीर मोरे यांची आत्महत्या
राहुल गांधींवर ममता बॅनर्जी नाराज?
महायुतीच्या त्रिशुळाने विरोधकांना घेतले धारेवर
इस्रोच्या मोहिमा या कमी बजेटमध्ये आखण्यात येतात आणि यशस्वी देखील होतात, अशी ओळख आता इस्रोने बनवली आहे. त्याप्रमाणेच इतर देशांच्या तुलनेत भारताने कमी बजेटमध्ये या सूर्य मोहिमेची योजना आखली आहे. भारताच्या आदित्य L1 मिशनसाठी ४०० कोटी रुपये खर्च आला. तर, नासाने आपल्या सूर्य मिशनसाठी १२ हजार ३०० कोटी रुपये खर्च केले आहेत.