२ सप्टेंबरला ‘आदित्य-एल-१’ घेणार सूर्याच्या दिशेने झेप; प्रक्षेपणासाठी सज्ज

यान करणार तब्बल 15 लाख किमीचा प्रवास

२ सप्टेंबरला ‘आदित्य-एल-१’  घेणार सूर्याच्या दिशेने झेप; प्रक्षेपणासाठी सज्ज

चांद्रयान-३ च्या यशस्वी मोहिमेनंतर आता भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) सूर्याच्या अभ्यासासाठी कटिबद्ध आहे. त्याकरिता इस्त्रो २ सप्टेंबर रोजी सकाळी ११.५० वाजता आदित्य-एल-१ हे यान पोलार सॅटेलाईटच्या (पीएसएलव्ही-सी ५७) माध्यमातून प्रक्षेपित करणार असून यानुषंगाने इस्त्रो सज्ज झाले आहे.

 

सूर्याला भारतीय संस्कृतीत आदित्य म्हंटले जात असल्यामुळे या मोहिमेचा नाव ‘आदित्य-एल-१’ ठेवण्यात आलेय. आदित्य म्हणजे सूर्य आणि लँग्रेस पॉईंट-१ म्हणजे एल-१ असे दोन शब्द जोडून ‘आदित्य-एल-१’ हा शब्द बनवण्यात आलाय. सूर्य आणि पृथ्वीच्यामध्ये ५ लॅग्रेंज पॉईंट आहेत. यातील पहिल्या पॉईंटवर भारताचे हे यान जाणार आहे. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, एल १ पॉईंट हा पृथ्वीपासून जवळपास १५ लाख किलोमीटर दूर आहे.

 

हे ही वाचा:

१९९१ च्या भुजबळांची आठवण झाली.. यावेळीही पुरून उरणार काय?

हिंडेनबर्ग अहवालाला पुन्हा हवा देण्यासाठी खोटे आरोप; अदानी समुहाचा दावा

८० टक्के भारतीय म्हणतात पुन्हा मोदीच!

राज्यात नवीन महाविद्यालये सुरू करण्यासाठी बृहत् आराखड्यास मान्यता

आदित्य एल १ हे सूर्याच्या एल १ पॉईंटवरुन सूर्याचा अभ्यास करणार आहे. सूर्य आणि पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे अंतराळात या जागेवर पार्किंगची जागा उपलब्ध होते. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, या जागेवर सूर्य आणि पृथ्वीचे गुरुत्वाकर्षणाचा समतोल साधला जातो, ज्यामुळे कोणतीही गोष्ट याठिकाणी दीर्घकाळ राहू शकते. म्हणूनच आदित्य-एल १ हे लॅग्रेंज पॉईंट १ वर लाँच केले जाणार आहे. तिथून हे यान सूर्यावर लक्ष ठेवणार असून त्याचा अभ्यास करणार आहे.

 

इस्रोच्या माहितीनुसार, आदित्य-एल १ सूर्याच्या विविध स्तरांचा अभ्यास करणार आहे. त्यासाठी सात पेलोड्स पाठवण्यात येणार आहेत. स्पेसक्राफ्टमध्ये बसवलेले हे पेलोड्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक, पार्टिकल आणि मॅग्नेटिक फील्ड डिटेक्टरच्या मदतीने फोटोस्फियर, क्रोमोस्फियर आणि सूर्याच्या सर्वात बाहेरील थराचा अभ्यास करतील. या सात पेलोड्सपैकी चार पेलोड्स हे सूर्याचा अभ्यास करणार आहेत. तर उरलेले तीन एल १ मधील कणांचा अभ्यास करतील. भारताची ही मोहीम देखील यशस्वी होईल असा विश्वास इस्रोच्या शास्रज्ञांनी व्यक्त केला आहे.

Exit mobile version