आदित्य एल-१ने चौथ्यांदा यशस्वीपणे बदलली कक्षा

लँग्रेज पॉइंट एल १ येथे यानाला स्थानापन्न करणार

आदित्य एल-१ने चौथ्यांदा यशस्वीपणे बदलली कक्षा

भारताची पहिलीवहिली सौर मोहीम असणाऱ्या आदित्य एल-१ यानाने चौथ्यांदा पृथ्वीची कक्षा बदलली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) शुक्रवारी रात्री ही प्रक्रिया पूर्ण केली. या प्रक्रियेसाठी काही काळाकरिता थ्रस्टर फायर केले गेले. इस्रोने ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याबाबत माहिती दिली. या मोहिमेदरम्यान मॉरिशस, बेंगळुरू आणि पोर्ट ब्लेअरस्थित केंद्रांनी या प्रक्रियेवर लक्ष ठेवले होते. आता १९ सप्टेंबर रोजी रात्री दोन वाजता लँग्रेज पॉइंट एल १ येथे यानाला स्थानापन्न करण्यासाठी पुन्हा यानाची कक्षा वाढवली जाईल.

याआधी १० सप्टेंबर रोजी रात्री अडीच वाजता आदित्य एल-१ अंतराळयानाची कक्षा वाढवण्यात आली होती. तेव्हा हे यान पृथ्वीपासून किमान ७९६ किमी ते कमाल ७१ हजार ७६७ किमी दूर अंतरावरील कक्षेत फिरत होते. त्याआधी ३ सप्टेंबर रोजी आदित्य एल १ने पहिल्यांदा ही कक्षा यशस्वीपणे बदलली होती. त्यावेळी सकाळी पावणे बाराच्या सुमारास पहिल्यांदा पृथ्वीकडून संदेश देण्यात आला होता. तर, ५ सप्टेंबर रोजी दुसऱ्यांदा यानाने कक्षा बदलली होती. इस्रोने ट्वीट करून याबाबतची माहिती दिली. आदित्य एल-१ हे यान सुमारे १६ दिवस पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करेल. या दरम्यान पाचवेळा आदित्य एल-१ यानाची कक्षा बदलली जाईल.

हे ही वाचा :

गणेशोत्सव मंडळांना पाच वर्षांसाठी एकदाच घ्यावी लागणार परवानगी

संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम झालाय

उद्धवजी दंगली कोण घडवतायत ते जरा बघा

गणेशोत्सवासाठी दादर गजबजले

आदित्य एल-१ यान २ सप्टेंबर रोजी प्रक्षेपित करण्यात आले होते. पीएसएलव्ही सी ५७च्या माध्यमातून हे यान यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आले होते. हे यानही चांद्रयान-३प्रमाणे सर्वांत प्रथम पृथ्वीभोवती भ्रमण करेल आणि त्यानंतर सूर्याच्या दिशेने झेप घेईल.

Exit mobile version