28 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरविशेषइर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्त जखमींची अदिती तटकरेंनी घेतली भेट

इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्त जखमींची अदिती तटकरेंनी घेतली भेट

जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च शासन करणार

Google News Follow

Related

रायगडमधील खालापूर जवळील इर्शाळवाडी गावावर दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी मदतकार्य सुरू असून पाऊस, धुकं आणि निमुळत्या वाटेमुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत. या दुर्घटनेत जखमी झालेल्या नागरिकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जखमींवर कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असून महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी गुरुवार, २० जुलै रोजी सकाळी या रुग्णांची भेट घेतली. तसेच त्यांची विचारपूस देखील केली. जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च शासन करणार असल्यचेही त्यांनी सांगितले. रुग्णांवर योग्य उपचार करण्यात यावे आणि या दुर्घटनेतील आणखी जखमी नागरिक रुग्णालयात आल्यास प्रशासनाने सज्ज असावे यासाठी डॉक्टरांशी चर्चा केली. यावेळी एमजीएम चे डॉ. सागर, पनवेल महापालिकेचे डॉ. गोसावी नायब तहसीलदार पनवेल लाचके उपस्थित होते.

हे ही वाचा:

मणिपूरमधील क्रूरता; दोन महिलांची नग्न धिंड काढत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार

बचावकार्यासाठी जाताना अग्निशमन दलाच्या जवानाचा दम लागून मृत्यू

दरड कोसळून गाव भुईसपाट

तर अमित शहांच्या बाजूला उद्धव ठाकरे असते…

या दुर्घटनेत मृत पावलेल्या कुटुंबांना शासन पाच लाखांची मदत करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे. तसेच या गावात सुरू असलेल्या बचाव कार्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घटनास्थळी उपस्थित राहून लक्ष देत आहेत. तर, नियंत्रण कक्षातून उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः लक्ष देऊन आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा