23 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेष'आदिपुरुष' च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर!

‘आदिपुरुष’ च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर!

Google News Follow

Related

बॉलिवूडमध्ये धमाका करणारा मराठमोळा सिने दिग्दर्शक ओम राऊत याच्या बहुचर्चित आदिपुरुष या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. मंगळवार, १ मार्च रोजी महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर ही घोषणा करण्यात आली आहे. २०२३ साली १२ जानेवारी रोजीहा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ओम राऊत यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यांवरून ही माहिती दिली आहे.

ओम राऊत यांनी सोमवार, २८ फेब्रुवारी रोजीच हे घोषित केले होते की ते मंगळवारी सकाळी ७ वाजून ११ मिनिटांनी आदिपुरुष या त्यांच्या आगामी चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर करतील. त्यानुसारच त्यांनी हा दिनांक घोषित केला आहे. ओम राऊत यांच्या आदिपुरुष या चित्रपटाची सुवातीपासूनच चांगली चर्चा रंगताना दिसली होती.

हे ही वाचा:

‘काचा बदाम’ फेम भुबन बड्याकर यांचा अपघात

‘दाऊदशी संबंधित लोकांना वाचवण्यासाठी ठाकरे सरकारकडे वेळ आहे’

उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत उतरले ईडीचे माजी सहसंचालक

क्रीडा जगतातून रशिया, पुतीनची कोंडी

आदिपुरुष हा चित्रपट प्रभू रामचंद्राच्या जीवनावर आधारित आहे. प्रभू रामचंद्रांची कथा या चित्रपटाच्या निमित्ताने रुपेरी पडद्यावर येणार आहे. या चित्रपटात सुपरस्टार प्रभास हा प्रभू रामचंद्रांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर क्रिती सॅनन ही सीता मैय्याची भूमिका आणि सैफ अली खान हा रावणाची भूमिका साकारताना दिसेल. यांच्या सोबतच सनी सिंग हा लक्ष्मणाच्या भूमिकेत, तर देवदत्त नागे हा हनुमानाच्या भूमिकेत असेल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा