अत्यंत गाजावाजा करून प्रदर्शित झालेला “आदिपुरुष” हा मुख्यतः दोन कारणांमुळे टीकेचा धनी होत आहे – अत्यंत सुमार दर्जाचे VFX आणि अत्यंत नाक्यावर चालणाऱ्या टपोरी संवादासारखे डायलॉगस. आणि यावरून गेले दोन दिवस मेमेच्या रूपाने सुरु झालेल्या ऑनलाईन ट्रोलिंग व्यतिरिक्त, ओम राऊतने काढलेल्या या चित्रपट निर्मितीवर समीक्षक आणि प्रेक्षकही तीव्र नापसंती व्यक्त करत आहेत. हे सर्व टीकेचं वावटळ चोहोबाजूंनी अंगावर आल्यामुळे, आदिपुरुषच्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या संवादांना बदलण्याचे ठरवले आहे, जो बदल लवकरच चित्रपटगृहांमध्ये दिसून येईल.
आदिपुरुषने सहा महिने प्रेक्षकांची वाट पाहण्यास भाग पाडले. तथापि, जेव्हा तो प्रदर्शित झाला, तेव्हा चित्रपट अत्यंत खराब VFX आणि सुमार दर्जाच्या संवादांसाठी ट्रोल झाला. त्यातील काही संवाद तर, ‘मरेगा बेटे’, ‘बुवा का बगीचा हैं क्या’ आणि ‘जलेगी तेरे बाप की’ असले टपोरी छाप आहेत. खराब संवादांमुळे चित्रपटाला मिळालेल्या सर्व आक्षेपांच्या पार्श्वभूमीवर, चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्यात सुधारणा करून तो पुन्हा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.
चित्रपटाच्या टीमने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “आदिपुरुष जगभरातून प्रचंड प्रतिसाद मिळवत आहे आणि सर्व वयोगटातील प्रेक्षकांची मने जिंकत आहे. हा दृष्य देखावा एक संस्मरणीय सिनेमॅटिक अनुभव म्हणून प्रेक्षकांच्या अधिक पसंतीस उतरावा, यासाठी जनतेच्या मूल्यमापनाचा आणि सूचनांचा आदर करत टीम चित्रपटाच्या संवादांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेत आहे” पुढे अशीही पुस्ती जोडली आहे की, “बदललेले संवाद चित्रपटाच्या मूळ सार आणि हेतूला प्रतिध्वनित करतील, याची होण्याची खात्री करून, या संवादांचे पुनर्लेखन करत आहोत आणि येत्या काही दिवसांत ते चित्रपटगृहांमध्ये दिसून येतील. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून मिळणारा प्रचंड प्रतिसाद आणि वाढते उत्पन्न हे दिसत असूनही केवळ लोकभावनेचा आदर करत आम्ही हा निर्णय घेतला आहे.”
हे ही वाचा:
काँग्रेसची बैठक आटोपून नाना पटोले निघाल्यावर कार्यकर्त्यांमध्ये फ्रीस्टाइल हाणामारी
साक्षी मलिक ही काँग्रेसच्या हातातील बाहुले! कुस्तीगीरांमध्ये जुंपली
चिनी कंपनीचा नवा नियम; ‘विवाहबाह्य संबंध ठेवल्यास नोकरी गमवाल’
परीक्षेलाही बुरखा घालू द्या, म्हणत तेलंगणात मुलींकडून निषेध!
चित्रपटाच्या संवादांची जबाबदारी असलेले मनोज मुंतशिर शुक्ला यांनी ट्विटरवर एक लांबलचक नोट लिहिली. याचे सोप्या शब्दात भाषांतर करायचे झाल्यास, “मी आदिपुरुषमध्ये ४००० ओळी लिहिल्या, त्यातील काही महत्वाचे भावनिक संवाद हे केवळ ५ ओळींमध्ये होते. तथापि, उर्वरित शेकडो ओळींमध्ये, जिथे श्रीरामाचा गौरव केला गेला आहे, माँ सीतेच्या पावित्र्याचे वर्णन केले गेले आहे, त्याबद्दल मला कोणतीही प्रशंसा मिळाली नाही. का ते मला माहित नाही. ”
त्याच्या या पोस्ट करण्यामागचे कारण सांगताना ते पुढे म्हणाले, “ही पोस्ट का? कारण माझ्यासाठी तुमच्या भावनेपेक्षा मोठं काही नाही. मी माझ्या संवादांच्या बाजूने अगणित युक्तिवाद देऊ शकतो, परंतु यामुळे तुमचे दुःख कमी होणार नाही. मी आणि चित्रपटाच्या निर्मात्या-दिग्दर्शकाने तुम्हाला दुखावणारे काही संवाद सुधारण्याचे ठरवले आहे. ते या आठवड्यात चित्रपटात जोडले जातील.”