‘अधीर रंजन म्हणजे काँग्रेसमधील छुपे शत्रू’

तृणमूल काँग्रेसच्या अभिषेक बॅनर्जी यांचा घणाघात

‘अधीर रंजन म्हणजे काँग्रेसमधील छुपे शत्रू’

‘पश्चिम बंगालचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी हे त्यांच्या पक्षातील छुपे शत्रू आहेत,’ अशी टीका तृणमूल काँग्रेसचे नेते आणि ममता बॅनर्जी यांचे वारसदार अभिषेक बॅनर्जी यांनी सोमवारी केली.आगामी लोकसभा निवडणुकीतील जागावाटपासंदर्भात काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसमध्ये संघर्ष झाल्यानंतर तृणमूलने निवडणुका एकट्याने लढवण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर अभिषेक यांचे हे विधान आले आहे. अधीर रंजन चौधरी यांनी आम्ही बंगालच्या सत्ताधारी पक्षाकडे मतांची भीक मागणार नाही, असे विधान करून तृणमूलवर टीका केली होती.

इंडिया आघाडीच्या पाटण्यात झालेल्या सुरुवातीच्या बैठकीपासूनच जागावाटपाची बाब चिंतेचा विषय ठरली आहे. तेव्हापासूनच तृणमूल काँग्रेसच्या वतीने काँग्रेसला जागावाटपासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी विनंती करण्यात आली होती, असा दावा अभिषेक यांनी केला. त्यांनी काँग्रेसशी कोणतीही चर्चा करण्यास नकार दिला नव्हता, मात्र त्यांनी लगेचच त्यांची भूमिका बदलली. ‘आता त्यांना तृणमूल हवे आहे, जे खूप महत्त्वाचे आहे,’ असे ते म्हणाले. तसेच, अधीर रंजन चौधरी यांनी पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची केलेली मागणीही चिंताजनक असल्याचे बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

हेमंत सोरेन यांची पत्नी झारखंडच्या मुख्यमंत्री होतील!

एलॉन मस्क शिरले मानवाच्या मेंदूत!

आयएनएस सुमित्राने चाचेगिरीचा प्रयत्न हाणून पाडला; १९ पाकिस्तानी नागरिकांसह इराणी जहाजाला वाचविण्यात यश

ईडीच्या छापेमारीनंतर झारखंडचे मुख्यमंत्री बेपत्ता; विमानतळावर अलर्ट जारी

‘काँग्रेस बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीची मागणी कशी काय करू शकतात? ईडी बंगालमध्ये चांगले काम करत आहे, पण दिल्लीत नाही, असे काँग्रेसचे नेतृत्व सातत्याने म्हणत आहे,’ अशीही टीका बॅनर्जी यांनी केली. ‘अधीर रंजन चौधरींना बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट हवी आहे. ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि इंडिया आघाडीचे सदस्य असताना ते ममता बॅनर्जी यांना आव्हान कसे देऊ शकतात? ते काँग्रेसमधील छुपे शत्रू आहेत. ,’ असा घणाघात बॅनर्जी यांनी केला. ते काँग्रेसला बळकट करत आहेत की भाजपला?, असा सवालही त्यांनी केला.

Exit mobile version