प्रवाशांच्या सोयीसाठी गाडी क्रमांक १२४७१ / १२४७२ आणि ट्रेन क्रमांक २०४८४/२०८४३ यांना सहा महिन्यांच्या कालावधीसाठी प्रायोगिक तत्त्वावर पालघर स्थानकावर अतिरिक्त थांबा देण्यात आला आहे. तसेच संजन स्थानकावरील गाडी क्रमांक १९४१७ मुंबई सेंट्रल-अहमदाबाद एक्सप्रेसच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे
गाडी क्रमांक १२४७१/१२४७२ वांद्रे टर्मिनस – श्री माता वैष्णो देवी कटरा स्वराज सुपरफास्ट एक्स्प्रेसला १४ जुलै २०२२ पासून वांद्रे टर्मिनसहून सुटणाऱ्या आणि १२ जुलै २०२२ पासून श्री माता वैष्णो देवी कटरा येथून सुटणाऱ्या गाड्यांसाठी पालघर स्टेशनवर अतिरिक्त थांबा देण्यात आला असल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी निवेदनात म्हटले आहे.
त्यानुसार, गाडी क्रमांक १२४७१ वांद्रे टर्मिनस – श्री माता वैष्णोदेवी कटरा स्वराज सुपरफास्ट एक्सप्रेस पालघरला १२.०८ वाजता पोहोचेल आणि १२.१० वाजता सुटेल. त्याचप्रमाणे गाडी क्रमांक १२४७२ श्री माता वैष्णो देवी कटरा – वांद्रे टर्मिनस स्वराज सुपरफास्ट एक्सप्रेस पालघरला १४.२८ वाजता पोहोचेल आणि १४.३० वाजता सुटेल. गाडी क्रमांक २०४८४/२०४८३ दादर-भगत की कोठी सुपरफास्ट एक्स्प्रेसला दादर येथून आणि १४ जुलै २०२२ पासून भगत की कोठी येथून सुटणाऱ्या गाडीला पालघर स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.
त्यानुसार, गाडी क्रमांक २०,४८४ दादर – भगत की कोठी सुपरफास्ट एक्स्प्रेस १६. १२ वाजता पालघरला पोहोचेल आणि १६.१४ वाजता सुटेल. तसेच गाडी क्रमांक २०४८३ भगत की कोठी – दादर सुपरफास्ट एक्स्प्रेस १०. ५१ वाजता पालघरला पोहोचेल आणि १०. ५३ वाजता सुटेल. तसेच, गाडी क्रमांक १९४११ मुंबई सेंट्रल-अहमदाबादच्या संजन स्थानकावरील वेळेत सुधारणा करण्यात आली आहे आणि आता ही ट्रेन १६. ४५/१६. ४७ तासांच्या सध्याच्या वेळेऐवजी १२ जुलै २०२२ पासून संजन स्थानकावर १६.५१/१६. ५३ वाजता पोहोचेल/सुटेल.