आदर्श बंधु संघाच्या वतीने ‘फाग महोत्सव २०२५’ मोठ्या दणक्यात, उत्साहात आणि भव्यतेने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात होळी गीत, रसभंगा आणि फुलांच्या होळीचे विशेष आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात ईश्वराच्या पूजा-अर्चनेने करण्यात आली.
श्री ललित पांडेय यांनी सर्व अतिथींसाठी थंडाईची व्यवस्था केली. कोषाध्यक्ष श्री अरुण पांडेय यांनी अतिथींचे उत्स्फूर्त स्वागत केले. कार्यक्रमाचे संचालन श्री प्रशांत त्रिपाठी यांनी केले. कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन आणि जबाबदारी संघाचे कार्याध्यक्ष डॉ. श्री शशिकांत दयानाथ मिश्रा यांनी पार पाडली.
या कार्यक्रमाला समाजातील प्रतिष्ठित आणि मान्यवर व्यक्ती उपस्थित होत्या. ज्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून गौरी ग्राम सेवा मंडळाचे महामंत्री श्री सुभाष उपाध्याय, उत्तर भारतीय संघाचे महामंत्री श्री देवेंद्र तिवारी आणि इतर मान्यवरांचा समावेश होता.
हेही वाचा :
भारताच्या ताब्यात न येण्यासाठी राणाची तडफड सुरूचं; स्थगितीसाठी मुख्य न्यायाधीशांकडे अर्ज
भारतीय विद्यार्थी बदर खान अमेरिकेत करत होता हमासचा प्रचार; केली अटक
दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना अटक करून चौकशी करा
दिल्लीमधील ‘अकबर रोड’ लिहिलेल्या साइन बोर्डला काळे फासून महाराणा प्रताप यांचा लावला फोटो
संघाचे अध्यक्ष श्री अखिलेश तिवारी यांनी सांगितले की, श्री शिव साईधामचे अध्यक्ष श्री अजीत पांडेय यांनी पीडितांच्या सेवेसाठी संघाला दरमहा ११ हजार रुपये देण्याची घोषणा केली. आपल्या भाषणात अध्यक्षांनी समाजातील संपन्न व्यक्तींना गरजू लोकांच्या मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले. जेणेकरून समाज अधिक सक्षम आणि संघटित होऊ शकतील.
कार्यक्रमाचा समारोप रात्रीच्या भोजनाने करण्यात आला. संयोजक श्री अक्षैबर तिवारी यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.
आदर्श बंधु संघाचे हे आयोजन सामाजिक एकता आणि सेवा भावनेचे प्रतीक ठरले. जिथे सर्व सहभागी नागरिकांनी आनंद घेतला आणि समाजसेवेसाठी प्रेरणा घेतली.