कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांवर अदार पूनावाला म्हणाले, लसीचे ५० ते ६० लाख डोस उपलब्ध. २४ तासात देशात कोरोनाचे १२,१९३ रुग्ण आढळले असून त्यानंतर देशातील कोरोनाचे सक्रिय रुग्ण ६७,५५६ झाले आहेत.सध्याचा कोविड ताण फारसा धोकादायक नाही परंतु खबरदारीचा उपाय म्हणून वृद्ध लोक लसीचा बूस्टर डोस घेऊ शकतात परंतु त्यांना बूस्टर डोस घ्यायचा आहे की नाही हे त्यांच्यावर अवलंबून आहे,असे पूनावाला म्हणाले.
देशात मार्चमहिन्यापासून पुन्हा कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत.पुन्हा एकदा संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोनाची दहशत भारतातही निर्माण झाली आहे.या व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये त्यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रातही वाढत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला यांनी सांगितले आहे की, त्यांच्या कंपनीने यापूर्वीच कोव्होव्हॅक्स लसीचे ५०-६० लाख डोस तयार केले आहेत.
हे ही वाचा:
जम्मू-काश्मीरचे सांगिओटे गाव ईद साजरी करणार नाही!
साईभक्तानो शिर्डीत साईबाबाला हार, फुले अर्पण करा!
खारघर मध्ये उभारणार स्वयंचलित हवामान केंद्र !
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या केरळ दौऱ्याच्या आधी आत्मघातकी हल्ल्याची धमकी
ते असेही म्हणाले की, कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत पण कोरोनाचा हा स्ट्रेन फारसा धोकादायक नाही. प्रसारमाध्यमांशी बोलताना पूनावाला यांनी ही माहिती दिली. गेल्या २४ तासात देशात कोरोनाचे १२,१९३ रुग्ण आढळले असून त्यानंतर देशातील कोरोनाचे सक्रिय रुग्ण ६७,५५६ झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी ही माहिती दिली.कोव्हॅक्सचे ५० ते ६० लाख डोस उपलब्ध असून तसेच येत्या दोन-तीन महिन्यांत हेच कोविशिल्ड डोस तयार करण्याची आमची तयारी आहे त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही असेही पुनावाला म्हणाले.
पूनावाला म्हणाले की, कोव्हॅक्सचा पुरवठा अमेरिका आणि युरोपला केला जात आहे.भारतात तयार झालेली ही एकमेव कोविड लस आहे जी अमेरिका आणि युरोपमध्ये मंजूर आहे. मात्र, अजूनही मागणी कमी आहे. महाराष्ट्र सरकारच्या हेल्थ बुलेटिननुसार, राज्यात कोरोनाचा सध्याचा स्ट्रेन ओमिक्रॉनचा एक्सबीबी.१.१६ व्हेरिएंट आहे. त्याचवेळी केंद्राने उत्तर प्रदेश, तामिळनाडू, महाराष्ट्र आदी आठ राज्यांना कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी कडक पावले उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत.महाराष्ट्रात गेल्या २४ तासात ९९३ कोरोना बाधित तर ५ जणांचा मृत्यू झाला आहे.