अदर पुनावालांभोवती ‘वाय’ दर्जाचे सुरक्षा कडे

अदर पुनावालांभोवती ‘वाय’ दर्जाचे सुरक्षा कडे

सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पूनावाला यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय हा भारत सरकारने घेतला आहे. गृह विभागाने या संबंधीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पूनावाला यांना आता देशभर सीआरपीएफचे जवान सुरक्षा पुरवणार आहेत.

देशातील महत्वाच्या व्यक्तींना सरकारकडून सुरक्षा पुरवली जाते. व्यक्तीच्या हुद्द्यानुसार त्यांना वेगवेगळ्या दर्जाच्या सुरक्षा दिल्या जातात. यातच आता अदर पूनावाला यांच्या नावाचा समावेश झाला आहे. कोरोना व्हायरस विरोधात तयार करण्यात आलेल्या कोविशील्ड या लसीची निर्मिती करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आहेत. त्यामुळेच त्यांना ही सुरक्षा देण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे.

हेही वाचा:

रत्नागिरीच्या लोटे एमआयडीसीत भीषण आग; जीवितहानी नाही

मोफत लशीची फक्त घोषणा, मग १ मेपासून लस का नाही?

लसीकरण केंद्रातील रांगांवर जालीम डोस कोणता?

मोफत लसीची घोषणा म्हणजे ठाकरे सरकारचे लबाडा घरचे आवताण…

काय असते वाय दर्जाची सुरक्षा?
जेव्हा एखाद्या व्यक्तीला वाय दर्जाची सुरक्षा देण्यात येते तेव्हा त्यात एकूण ११ जणांचा समावेश असतो. यात २ कमांडो असतात आणि इतर पोलीस कर्मचारी असतात. त्यामुळे आता पूनावाला यांना ११ जणांचे सुरक्षा कवच असणार आहे.

Exit mobile version