अदानी यांचे लक्ष आता इलेक्ट्रिक गाड्यांवर!

उबेर भागीदार होण्याची शक्यता

अदानी यांचे लक्ष आता इलेक्ट्रिक गाड्यांवर!

भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे उद्योग घराणे असणाऱ्या अदानी ग्रुपचे लक्ष आता इलेक्ट्रिक गाड्यांवर आहे. या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी अदानी ग्रुप उबर टेक्नॉलॉजीसोबत व्यूहात्मक भागीदारीसाठी काम करत आहे. उबर टेक्नॉलॉजीच्या राइड हेलिंग प्लॅटफॉर्मवर आपल्या इलेक्ट्रिक प्रवासी गाड्या दाखल करून समूहाने २०२२मध्ये दाखल केलेल्या सुपर ऍप अदानी वनवरची पकड मजूबत करण्याचा कंपनीचा उद्देश आहे. अदानी ग्रुपचे संचालक गौतम अदानी आणि उबरचे सीईओ दारा खोस्नोवशाही यांच्यामध्ये नुकतीच याबाबतची चर्चा झाली.

अदानी गाड्या खरेदी करणार; बनवणार नाहीत
अदानी समूह इलेक्ट्रिक गाड्यांची निर्मिती करणार नाहीत, तर त्या केवळ खरेदी करेल, त्यांचे ब्रँडिंग करेल आणि त्यांना उबर नेटवर्कशी जोडतील. त्यांनी नुकतीच तीन हजार ६०० इलेक्ट्रिक बसगाड्यांच्या सरकारी निविदेसाठी अर्ज केला आहे.

हे ही वाचा:

दारिद्र्यपातळी लक्षणीयरीत्या ५ टक्के खाली

बेंगळुरूमध्ये ज्येष्ठ महिलेची हत्या; ड्रममध्ये सापडले अवयव!

पुणे पोलिसांनी ६० तासांच्या मोहिमेत अमली पदार्थांची तस्करी उधळली

राष्ट्रीय लोकदलाच्या हरयाणा अध्यक्षाची गोळी झाडून हत्या!

उबरचा उद्देश काय
उबरचा उद्देश त्यांच्या ताफ्यातील गाड्या इलेक्ट्रिक वाहनांमध्ये बदलण्याचा आहे. त्यांना सन २०४०आधी स्वतःला शून्य उत्सर्जन मोबिलिटी प्लॅटफॉर्ममध्ये बदल करायचा आहे. अदानी-उबर भागीदारीमध्ये भारतात चार इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याची क्षमता आहे.

अदानींचा फायदा काय?
या भागीदारीमुळे अदानी वनच्या विस्ताराला मदत मिळेल. उबर विमानांचे बुकिंग, हॉलिडे पॅकेज, एअरपोर्ट सर्व्हिस आणि कॅब बुकिंगसारखी सेवा प्रदान करू शकतो. अदानी ग्रुप पुढील १० वर्षांत भारताच्या हरित ऊर्जा निर्मितीत १०० कोटींची गुंतवणूक करेल आणि सन २०२७पर्यंत सौरऊर्जा निर्मिती क्षमतेला १० गीगावॉटपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य कंपनीने ठेवले आहे. भारतात ओला आणि उबर यांच्यात तीव्र स्पर्धा आहे. ओलाने इलेक्ट्रिक वाहनांवरही लक्ष केंद्रीत केले असून लवकरच त्यांचा आयपीओही बाजारात येणार आहे.

Exit mobile version