31 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरविशेषअदानी करणार आशियातील सर्वात मोठ्या धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकास

अदानी करणार आशियातील सर्वात मोठ्या धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकास

प्रकल्प पूर्ण झाल्यावर ५६,००० लोकांचे पुनर्वसन होणार

Google News Follow

Related

गौतम अदानी यांची रिअल इस्टेट कंपनी अदानी रियल्टीने देशाच्या व्यावसायिक राजधानी मुंबईतील मुख्य भूमीवर असलेल्या धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकास करण्याची बोली जिंकली आहे. धारावीची झोपडपट्टी आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्ट्यांमध्ये गणली जाते. डीएलएफ सारख्या आघाडीच्या रिअल इस्टेट कंपनीला मागे टाकून अदानी रियल्टीने ५,६०९ कोटी रुपयांची बोली लावून धारावी पुनर्विकास प्रकल्प जिंकला आहे.

ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्र सरकारने धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पासाठी नवीन जागतिक निविदा काढली होती. ज्यामध्ये अदानी रियल्टी व्यतिरिक्त डीएलएफ आणि मुंबईच्या श्री नमन डेव्हलपर्सने हा प्रकल्प मिळवण्यासाठी बोली लावली होती. जागतिक कंपन्यांसह एकूण ८ कंपन्यांनी हा प्रकल्प मिळविण्यासाठी बोली लावली होती.

अदानीने सर्वाधिक ५०६९ कोटी रुपयांची बोली लावली. तर डीएलएफने २,२०५ कोटींची बोली लावली होती. तांत्रिक कारणामुळे श्री नमन डेव्हलपर्सची बोली उघडण्यात आली नाही. आता अदानींची बोली राज्य सचिवांच्या समितीकडे पाठवली जाईल असे धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे सीईओ एसव्हीआर श्रीनिवास यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा : 

सूरतमध्ये केजरीवालांच्या प्रचार रॅलीमध्ये दगडफेक

नाशिक आश्रमातील मुलींवरील अत्याचारप्रकरणी चित्रा वाघ यांनी घेतली कठोर भूमिका

शिवडीचा किल्ला अतिक्रमणातून मुक्त करणार

राहुल गांधींविरोधात रणजीत सावरकर यांचा नोंदविला जबाब

महाराष्ट्र सरकारला एका कंपनीसोबत भागीदारीत धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकास करायचा आहे. ज्यामध्ये आघाडीच्या भागीदाराकडे ४०० कोटी रुपयांसह ८० टक्के इक्विटी असेल, तर राज्य सरकारकडे २०टक्के इक्विटी असेल. या प्रकल्पाच्या विकासामुळे झोपडपट्टीवासीयांना फायदा होणार असून, मुंबई शहराची सुधारणा होण्यास मदत होणार आहे.

धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत पात्र लोकांना धारावीतील झोपडपट्टीवासीयांसाठी मोफत घरे दिली जाणार असून, त्यामध्ये सर्व प्रकारच्या सुविधा असतील. प्रकल्पाचे काम सुरू करण्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतर पहिल्या टप्प्याचे काम सात वर्षांत पूर्ण होणार आहे. १७ वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होण्यास वेळ लागेल, असे मानले जात आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर ५६,००० लोकांचे पुनर्वसन होणार आहे. या झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना ४०५ चौरस फूट क्षेत्रफळाचे घर मिळणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा