धारावी झोपडपट्टीचे रुपडे लवकरच पालटणार!

पुनर्विकास करण्यासाठी अदानी समूहाला मंजुरी

धारावी झोपडपट्टीचे रुपडे लवकरच पालटणार!

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या धारावी झोपडपट्टीचे रुपडे लवकरच पालटणार आहे. मुंबईतील धारावीचा पुनर्विकास करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने अदानी समूहाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता लवकरच अदानी समूह धारावी पुनर्विकास प्रकल्प सुरू करू शकतो.

धारावी हे ८ लाख लोकसंख्या असलेले आशियात सर्वात दाट लोकवस्तीचे ठिकाण आहे. या दाट लोकवस्तीच्या सुशोभिकरणाचे काम अदानी समूहाला दिले आहे. प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एसव्हीआर श्रीनिवास यांनी शासन निर्णय जारी केल्याची माहिती दिली.

या कामासंबंधीचे पत्र लवकरच दिले जाणार असून त्यानंतर अदानी समूह या प्रकल्पावर काम करण्यास सुरुवात करेल. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी २३ हजार कोटी रुपये खर्च येणार आहे.

हे ही वाचा:

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना सर्वोच्च न्यायालयाकडून नोटीस

लखनऊच्या या ‘रॉकेट वूमन’कडे चांद्रयान ३ ची जबाबदारी

बंद दाराआड झालेल्या गोष्टी ठाकरेंच्या आग्रहाखातर रश्मी वहिनींना सांगाव्या लागल्या

मोदी यांचा ‘ग्रँड क्रॉस ऑफ द लिजन ऑफ ऑनर’ पुरस्काराने सन्मान

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अदानी समूहाने धारावी झोपडपट्टीच्या पुनर्बांधणीसाठी बोली लावली होती. त्यावेळी अदानी समूहाने यासाठी ५ हजार ६९ कोटी रुपयांची बोली लावली होती. अदानी इन्फ्रा हे या भागातील सुशोभीकरणाचे काम करणार आहे.

Exit mobile version