अदानी विंड एनर्जी कच्छ थ्री लिमिटेड (एडब्ल्युइकेटीएल) या अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड यां कंपनीच्या उपकंपनीने, कच्छ (गुजरात) मध्ये १०० मेगावॅट क्षमतेचा पवन ऊर्जा प्रकल्प चालू केला आहे. हा प्रकल्प त्याच्या नियोजित वेळेच्या पाच महिने आधीच पूर्णत्वास गेला आहे.
हे ही वाचा:
राज्याचा अर्थसंकल्प म्हणजे मुंबईकरांना मोठ्ठा भोपळा अन् राज्यातील जनतेला नारळ- अतुल भातखळकर
या प्रकल्पानंतर गेल्या १२ महिन्यात या कंपनीने वेळेपूर्वी पूर्ण केलेला हा पाचवा प्रकल्प ठरला आहे.
या प्रकल्पाने सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सोबत विद्युत खरेदी करार केला आहे. या करारानुसार अदानी प्रकल्प सोलर एनर्जी कॉर्पोरेशनकडून ₹२.८२ प्रति किलो वॅट प्रति तास या दराने विज खरेदी करू शकतो.
हा प्रकल्प चालू झाल्यानंतर कंपनी ४९७ मेगावॅट ऊर्जा तयार करणारे चालू पवन ऊर्जा प्रकल्प आहेत. एजीइएलकडे एकूण अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांतून १४,८१५ मेगावॅट ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता आहे. त्यापैकी ११,४७० मेगावॅट ऊर्जा प्रकल्प चालू होण्याच्या वेगवेगळ्या पातळीवर आहेत.
कोविड-१९च्या विविध अडचणी असूनही, कंपनीने गेल्या १२ महिन्यात ८०० मेगावॅट पुनर्वापरायोग्य संसाधनांचे ऊर्जा प्रकल्प चालू केले आहेत.
इतर सर्व प्रकल्पांप्रमाणेच नव्याने चालू करण्यात आलेला हा प्रकल्पाचे व्यवस्थापन अदानी समुहाच्या इंटलिजंट एनर्जी नेटवर्क ऑपरेशन सेंटर या एजीईएल या कंपनीच्यामार्फत पाहिले जाईल.