24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषमहाराष्ट्रात स्मार्ट मीटर बसवण्यासाठी अदानींना मिळाले १३,८८८ कोटी रुपयांचे कंत्राट !

महाराष्ट्रात स्मार्ट मीटर बसवण्यासाठी अदानींना मिळाले १३,८८८ कोटी रुपयांचे कंत्राट !

जुन्या मीटरच्या ठिकाणी आता नवीन स्मार्ट मीटर

Google News Follow

Related

महाराष्ट्रामधील सर्व वीज ग्राहकांचे सर्व मीटर बदलले जाणार असून त्या ठिकाणी आता नवे स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहेत. त्यासाठी एकूण २६ हजार ९२१ कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहेत. यासंबंधीत आज सहा टेंडर्सना मंजुरी देण्यात आली आहे. भांडुप, कल्याण, कोकण, बारामती, पुणे या भागातले मीटर अदानी ग्रुप कंपनीकडून बदलण्यात येणार आहेत.

हे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी सरकारी मालकीच्या डिस्कॉमकडून अदानी समूहाने १९,८८८ कोटी रुपयांचे दोन कंत्राट मिळवले आहे.याआधीही अदानी समूहाला चार ते पाच राज्यांमध्ये नवे स्मार्ट मीटर बसवण्याचे कंत्राट मिळाले होते.त्यानंतर आता मुंबईत स्मार्ट मीटर बसवण्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळाल्यानंतर बाजारात ३० % इतका हिस्सा झाल्याने अदानी समूह हा देशातील सर्वात मोठा स्मार्ट मीटर पुरवठादार बनणार आहे.

हे ही वाचा:

सनातन धर्मावर टिप्पणी केल्याप्रकरणी उदयनिधी स्टॅलिनला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस !

आयुषमान भव : चार दिवसात ५ लाख लाभार्थी कार्ड !

राहुल गांधींचे परदेशात जाऊन भारतावर टीका करणे सुरूच..

महिला आरक्षण विधेयकाचे श्रेय नरसिंह राव यांना !

महाराष्ट्र राज्यात MSEDCL मध्ये स्मार्ट प्रीपेड मीटरिंगसाठी प्रगत मीटरिंग इन्फ्रास्ट्रक्चर (AMI) सेवा प्रदात्याच्या नियुक्तीसाठी सात निविदा मागवल्या होत्या. त्यापैकी सहा निविदा अंतिम झाल्या आहेत. कोणते स्मार्ट मीटर बसवायचे याची निवड ग्राहकांना द्यावी, अशी सूचना महावितरणने केली आहे. कंपनीने आधीच स्मार्ट प्रीपेड मीटर योजना सुरू केली आहे, जी पुरेशा प्रमाणात ग्राहकांना आकर्षित करण्यात अयशस्वी ठरली आहे. केंद्र सरकारच्या सुधारित वितरण क्षेत्र योजनेच्या पहिल्या टप्प्यात २२.८ दशलक्ष स्मार्ट मीटर बसवण्याची तयारी करत आहे.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने राज्यभरात स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याच्या तयारी सुरु केली आहे.स्मार्ट प्रीपेड मीटरची किंमत प्रत्येकी २६०० रुपये इतकी आहे. यामध्ये मोबाईल फोनप्रमाणे ऑनलाइन रिचार्ज केले जाऊ शकते.जर वेळेवर बिल न भरल्यास वीज खंडीत करण्याची सुविधा या स्मार्ट मीटर मध्ये आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा