सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, भारतीय निवडणूक आयोगाने गुरुवारी निवडणूक रोख्यांसंदर्भातील तपशील वेबसाइटवर जाहीर केला. निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून अनेक उद्योगांनी राजकीय पक्षांना निधी दिला असला तरी यात देशातील सर्वांत मोठे उद्योजक अदानी किंवा अंबानी यांचा समावेश नाही. निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार, सर्वांत मोठी एक हजार ३६८ कोटींची देणगी फ्युचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेसने दिली आहे.
या कंपनीने सन २०१९ ते २०२४ दरम्यान निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून सर्वाधिक देणगी दिली. ही कंपनी गेमिंग व्यवसायात आहे. ही खासगी कंपनी तमिळनाडूमधील कोइम्बतूर येथे स्थित आहे. या कंपनीचे भागभांडवल १०.०७ कोटी आहे. ही कंपनी लॉटरी वितरकाच्या स्वरूपातही काम करते. या कंपनीचे संचालक मार्टिन सँटियागो व मानिक्का गौडर शिवप्रकाश हे दोघे आहेत. सँटियागो हे देशातील विविध ११४ वेगवेगळ्या कंपन्यांचे संचालक आहेत. तर, गौडर देशातील विविध २२ कंपन्यांमध्ये संचालक आहेत.
सर्वाधिक देणग्या देणाऱ्या कंपन्यांची नावे
- फ्युचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस – १,३६८ कोटी
- मेघा इंजिनीअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर – ९६६ कोटी
- क्विक सप्लाय चेन प्रायव्हेट लिमिटेड – ४१० कोटी
- हल्दिया एनर्जी लिमिटेड- ३७७ कोटी
- भारती ग्रुप – २४७ कोटी
- एस्सेल मायनिंग अँड इंडस्ट्रीज लिमिटेड – २२४ कोटी
- केवेंटर फूडपार्क इंफ्रा लिमिटेड- १९४ कोटी
- मदनलाल लिमिटेड – १८५ कोटी
- डीएलएफ ग्रुप – १७० कोटी
- गाजियाबादमधील यशोदा सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल – १६२ कोटी
- उत्कल एल्यूमिना इंटरनॅशनल- १४५.३ कोटी
- जिंदल स्टील अँड पॉवर लिमिटेड – १२३ कोटी
- बिर्ला कार्बन इंडिया- १०५ कोटी
- रूंगठा सन्स- १०० कोटी
- वेस्टर्न यूपी पॉवर ट्रान्समिशन कंपनी- २२० कोटी
- बिर्ला समूहाशी संबंधित कंपन्या – १०७ कोटी
- पिरामल समूह- ४८ कोटी
- सिप्ला कंपनी – ३९.०२ कोटी
- झायडस – २९ कोटी
- किरण मझूमदार शॉ- सहा कोटी
- लक्ष्मी मित्तल – ३५ कोटी
- भारत बायोटेक – १० कोटी
- वेदांता समूह – ४०२ कोटी
- टोरंट पॉवर – १०६ कोटी
- डॉ. रेड्डीज- ८० कोटी
- पिरामल एंटरप्राइजेज ग्रुप- ६० कोटी
- नवयुगा इंजीनीअरिंग – ५५ कोटी
- शिर्डी साई इलेक्ट्रिकल्स- ४० कोटी
- एडलवाइस ग्रुप- ४० कोटी
- ग्रासिम इंडस्ट्रीज- ३३ कोटी
- जिंदल स्टेनलेस – ३० कोटी
- बजाज ऑटो – २५ कोटी
- सन फार्मा लैबोरेटरीज – २५ कोटी
- मॅनकाइंड फार्मा – २४ कोटी
- बजाज फायनान्स – २० कोटी
- मारुति सुजुकी इंडिया- २० कोटी
- अल्ट्राटेक – १५ कोटी
- टीव्हीएस मोटर्स – १० कोटी
हे ही वाचा:
ममता बॅनर्जी जखमी, डोक्याला गंभीर दुखापत
राहुल गांधींनी विठ्ठलमूर्ती स्वीकारण्यास केली टाळाटाळ; व्हीडिओ व्हायरल
पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदीच सक्षम!
अनिल परबांना दणका; दापोलीमधील साई रिसॉर्ट चार आठवड्यात पाडावे लागणार