झारखंडमधील रामगढ जिल्ह्यात आदम सेना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुस्लिम तरुणांच्या संघटनेने स्थानिक गावांमध्ये शरिया कायदा लागू केला आहे. या अंतर्गत मुस्लिम मुलींना गैर-मुस्लिमांशी संवाद साधण्यास मनाई आहे आणि त्यांना बुरखा घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. जे असहमत आहेत त्यांना आदम सेनेच्या सदस्यांकडून बलात्कार, खून किंवा समाजातून बाहेर काढण्याच्या धमक्या येत असल्याचे चित्र आहे. या सर्व घडामोडी चिंताजनक असूनही पोलीस अधिकाऱ्यांनी परिस्थितीला केवळ जमिनीचा वाद म्हणून संबोधले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल, असे सांगितले जात आहे.
एका वृत्तानुसार हे प्रकरण राजराप्पा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील आहे. येथे तक्रारदार तरुणीने पोलिस ठाण्यात अर्ज केला आहे की, आदम सेनेचे कथित नेते सलमान आणि अहमद यांच्याकडून तिच्या जीवाला धोका आहे. डिसेंबर २०२३ मध्ये याच गावातील एका साबीर अलीने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मुलीने केला होता. ती कशा पद्धतीने सुटली तेही तिने सांगितले आहे. पीडित मुलीने मोठ्या आवाजात लोकांना मदतीसाठी हाक मारली असता साबीर अली आणि त्याच्या कुटुंबीयांनी तिला मारहाण केली. या बाबत पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. पिडीत मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांनी हे गाव सोडून जावे, म्हणून हा प्रकार करण्यात येत असल्याचे पिडीत मुलीने म्हटले आहे. शिवाय त्यांची जमीन सुद्धा बळकावली आहे.
हेही वाचा..
झारखंड: सर्व आरोपी अटक, स्पॅनिश जोडपे निघाले नेपाळला!
इस्रोकडून चांद्रयान-४ ची तयारी; एकाच मोहिमेत दोन प्रक्षेपण वाहने
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना आता भूमिपूजनाची अडचण
‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणाऱ्यास ऑल्ट न्यूजच्या मोहम्मद झुबेरकडून संरक्षण
१७ फेब्रुवारी २०२४ रोजी पीडित महिला पुन्हा एकदा या प्रकरणाबाबत पोलीस ठाण्यात आली. अलीकडेच जामिनावर सुटलेला साबीर अली त्याचे साथीदार, सलमान आणि अहमद हे तिची केस मागे घेण्यासाठी तिला धमकावत होते, अशी तक्रार तिने नोंदवली आहे. आरोप मागे घेण्यासाठी हे लोक तिच्यावर दबाव आणत असल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. ती मुलगी म्हणाली, त्या दोघांनी मला सांगितले की, आम्हाला प्रशासकीय कारवाई मान्य नाही. इथे शरिया कायदा लागू आहे. या लोकांनी मला आणि संपूर्ण कुटुंबाला मारहाण केली आणि आमचे सामानही घराबाहेर फेकून दिले आणि घराला कुलूप लावले. पीडित मुलीने आरोप केला आहे की आदम सेनेशी संबंधित काही लोकांनी तिला धमकावले आणि या प्रकरणात ‘तडजोड’ करण्यास सांगितले. अहमद अन्सारी यांना फोनवर शिवीगाळ करून धमकी दिली. तिने सांगितले की, वडिलांच्या मृत्यूनंतर ती इतर दोन भावंडांसोबत वडिलोपार्जित गावी परतली. मात्र त्यावेळी त्यांच्या वडिलोपार्जित जमिनीचे वाद उफाळून आले. आता आदम सेनेने शरिया कायद्याची अंमलबजावणी केली आहे, तिला बुरखा घालण्याची आणि इतर समुदायातील व्यक्तींशी संवाद साधण्यापासून परावृत्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
राजराप्पा पोलिस स्टेशनचे प्रभारी नवीन प्रकाश पांडे यांनी सांगितले की, हा संपूर्ण वाद जमिनीचा आहे. आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत. आम्ही सरपंच व इतरांशीही बोललो आहोत. ज्या आदम आर्मीचे नाव घेतले जात आहे, ते या भागात कुठेही सक्रिय नाही. तसेच त्याविरोधात अशी कोणतीही तक्रार आलेली नाही. पीडितेचे कुटुंब पूर्वी सिंगरौली येथे राहत होते. वडिलांच्या मृत्यूनंतर मुलगी तिच्या वडिलोपार्जित गावी आली आहे.