अभिनेत्री उर्वशी रौतेला म्हणाली, धन्यवाद, पंतप्रधान नरेंद्र मोदी! वाचा सविस्तर…

अभिनेत्री उर्वशी रौतेला म्हणाली, धन्यवाद, पंतप्रधान नरेंद्र मोदी! वाचा सविस्तर…

प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी रौतेलाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जलशक्तीचे प्रमुख गजेंद्र सिंह शेखावत यांचे मनापासून आभार मानले आहेत.

मिशन पानी जल शक्ती या जल मोहिमेसाठी अभिनेत्री उर्वशी रौतेला हीची देशव्यापी राजदूत म्हणून निवड करण्यात आली आहे. उर्वशीने याबाबत सोशल मीडियाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जल शक्तीचे मुख्य गजेंद्र सिंघ शेखवात यांनी जागतिक दर्जाच्या दिलेल्या संधीसाठी आभार व्यक्त केले आहेत. या अभिनेत्रीने तिच्या उर्वशी रौतेला फाऊंडेशनच्या माध्यमातून पाणी संकटाविरुद्ध लढा दिला आहे. ही संस्था तिने तिच्या पालकांसह सह-स्थापित केली आहे.

या फाउंडेशनच्या माध्यमातून उत्तराखंड, पौरी, गढवाल आणि हरिद्वारमधील शेकडो समुदायांना स्वच्छ पाणी मिळण्यास मदत झाली आहे. पाणी हे निसर्गाचे प्रेरणास्थान आहे, या भावनेतून या वर्षी तिने विविध संसाधने एकत्र करून स्वच्छता मोहिमेत सुधारणा तसेच सुरक्षित पाण्यापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक ज्ञान आत्मसात करण्याचे ध्येय बाळगले आहे.

या अभिनेत्रीने सांगितले की, भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे. या लोकसंख्येपैकी सहा टक्क्यांहून अधिक लोकांना स्वच्छ पाणी उपलब्ध नाही आणि भारतातील सुमारे १५ टक्के लोक उघड्यावर शौचास बसतात. भारतात आणि जगभरात, लाखो लोक सुरक्षित पाण्याशिवाय जगण्याच्या अतिरिक्त आव्हानासह कोविड साथीच्या आजारावर मार्गक्रमण करत आहेत. भारतातील कुटुंबांच्या आरोग्यासाठी आता नेहमीपेक्षा जास्त सुरक्षित पाणी मिळणे महत्त्वाचे आहे.

हे ही वाचा:

रतन टाटांना ‘आसाम वैभव’ पुरस्कार

रेल्वेचालक अडीच तास निवांत झोपला आणि गाडी लेट झाली!

व्हाय आय किल्ड गांधी चित्रपटावर बंदीची मागणी

श्रीनभ अग्रवालला पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार

 

या सगळ्या सोबतच ती एक कलाकार म्हणून सुद्धा उत्तम काम करते. अरब सुपरस्टार मोहम्मद रमजान सोबत तिच्या ‘व्हर्साचे बेबी’ या आंतरराष्ट्रीय गाण्यासाठी कौतुकही झाले होते. उर्वशी लवकरच जिओ स्टुडिओच्या वेब सीरिज ‘इन्स्पेक्टर अविनाश’मध्ये रणदीप हुड्डासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘थिरुट्टू पायले 2’ च्या हिंदी रिमेकसह ‘ब्लॅक रोज’ या द्विभाषिक थ्रिलरमध्ये ही अभिनेत्री मुख्य भूमिका साकारणार आहे. तिने जिओ स्टुडिओ आणि टी-सीरीजसोबत तीन चित्रपटांचा करारही केला आहे.

Exit mobile version