बॉलीवूडमधील ज्येष्ठ हिंदी टेलिव्हिजन प्रेझेंटर आणि अभिनेत्री मंजू सिंग यांचे निधन झाले. वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गुरुवारी त्यांचं मुंबईत निधन झाल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. मंजू सिंग यांच्या निधनाने गीतकार, अभिनेता आणि दिग्दर्शक स्वानंद किरकिरे यांना दु:ख झाले आहे. गीतकार, गायक आणि पटकथा लेखक स्वानंद किरकिरे यांनी मंजू सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर एक पोस्ट शेअर करताना, त्यांनी दूरदर्शनमध्ये त्यांच्यासोबत काम केलेल्या वेळेची आठवण करून दिली.
स्वानंदने ट्विटमध्ये लिहिले आहे की, “मंजू सिंग आता आपल्यात नाही! दूरदर्शनसाठी स्वराज हा कार्यक्रम लिहिण्यासाठी मंजूजींनी मला दिल्लीहून मुंबईत आणले. डीडीसाठी त्यांनी एक कहानी, शो टाईम इत्यादी अनेक अप्रतिम शो केले होते. हृषीकेश मुखर्जीचा गोलमालमधील रत्ना आमची प्रेमळ मंजू आम्ही तुमचे प्रेम कसे विसरु शकतो…अलविदा!”
मंजू सिंह जी नहीं रही ! मंजू जी मुझे दिल्ली से मुंबई लायी थी दूरदर्शन के लिए उनका शो स्वराज लिखने ! उन्होंने DD के लिए कई नायब शोज़ एक कहानी, शो टाइम आदि बनाए थे . हृषिकेश मुखर्जी की फ़िल्म गोलमाल की रत्ना हमारी प्यारी मंजू जी आपका प्यार कैसे भूल सकता है .. अलविदा ! pic.twitter.com/aKFvMJeFYF
— Swanand Kirkire (@swanandkirkire) April 15, 2022
मंजू सिंग यांनी स्वराज, एक कहानी, शो टाईम इत्यादी कार्यक्रमांची निर्मिती केली. तसेच मंजू ‘खेल टॉइज’ या लहान मुलांच्या कार्यक्रमाची सूत्रसंचालक होत्या. हा कार्यक्रम सुमारे सात वर्षे चालला. याशिवाय सिंह हृषिकेश मुखर्जीच्या गोलमाल या चित्रपटातही त्यांनी रत्नाची भूमिका साकारली होती.
हे ही वाचा:
रशियासमोर आता आणखी दोन ‘युक्रेन’!
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन येणार भारत दौऱ्यावर!
दोन एक्स्प्रेस धडकल्या; मध्य रेल्वेची वाहतूक अद्याप विस्कळीत
मंजू यांनी १९८३ मध्ये शोटाइमद्वारे टेलिव्हिजन निर्माता म्हणून पदार्पण केले. त्यांचा एक कहानी हा कार्यक्रम अनेक प्रादेशिक भाषांमधील साहित्यिक लघुकथांवर आधारित होता. अलीकडच्या काळात मंजू सिंग लहान मुलांसाठी आणि तरुणांसाठीच्या अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांशी संबंधित होत्या. २०१५ मध्ये, सर्जनशील कला आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना ओळखले गेले आणि भारत सरकारने त्यांची केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळ (CABE) सदस्य म्हणून नामांकन केले.