विक्रम गोखले यांच्या प्रकृतीला आराम पडतोय!

दीनानाथ रुग्णालयाने दिली माहिती

विक्रम गोखले यांच्या प्रकृतीला आराम पडतोय!

ज्येष्ठ रंगकर्मी- अभिनेते विक्रम गोखले (७७) यांच्यावर पुण्यातील येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृती संदर्भात होती. पण दीनानाथ रुग्णालयातून त्यांच्या प्रकृतीबाबत चांगली बातमी आली आहे. विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून पुढील ४८ तासांत व्हेंटिलेटर काढला जाऊ असे रुग्णालयाने म्हटले आहे.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी शिरिश याडगीकर म्हणाले, “गोखले यांच्या प्रकृतीत संथ पण स्थिर सुधारणा होत आहे. ते आता हळूहळू डोळ्यांची हालचाल करत आहेत. त्यांच्या हात-पायांची हालचाल होत आहे. त्यांना पुढील पुढील ४८ तासांत व्हेंटिलेटर काढला जाऊ शकतो . त्यांचा रक्तदाब आणि हृदयाचे ठोके ठीक असल्याचे त्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरे राज्यपालांवर घसरले!

एअर इंडियाच्या विमानातील कर्मचाऱ्यांना टिकली, बांगडीबद्दल सूचना

या दोन देशात मशीद का नाही?

पोलिस भरतीची तयारी विसरून तो चोर बनला!

विक्रम गोखले यांच्यावर गेल्या १५ दिवसांपासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु आहेत . बुधवारी त्यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले. दीनानाथ रुग्णालयाने रुग्णालयाने त्यांचे हेल्थ बुलेटिन जारी केले असून त्यामध्ये विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत असून त्यांनी डोळे उघडले आहेत. पुढील ४८तासांत त्यांचा व्हेंटिलेटर काढला जाऊ शकतो. तसेच बीपी आणि हृदयाची क्रिया सुरळीत सुरू आहे, असे म्हटले आहे.
विक्रम गोखले यांचे निधन झाल्याचे वृत्त २४ नोव्हेंबर रोजी पसरले होते. बॉलिवूडमधील अनेकजणांनी त्यांना श्रद्धांजलीही वाहिली होती. पण विक्रम गोखले यांच्या पत्नी आणि मुलीने हे वृत्त फेटाळून लावले होते.

Exit mobile version